R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या अमरावतीत हिंसाचारानंतर इंटरनेट सेवा तीन दिवस बंद राहणार

अमरावतीत हिंसाचारानंतर इंटरनेट सेवा तीन दिवस बंद राहणार

 

अमरावती | अमरावतीमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या ताज्या घटनांनंतर शनिवारपासून संचारबंदी लागू करण्यात आला असून पुढचे तीन दिवस इंटरनेट सेवा निलंबित करण्यात आली. शहर पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी याबाबत माहिती दिली. तसेच वैद्यकीय कारणाशिवाय कोणालाही घराबाहेर न पडण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. अमरावतीमधील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे.

त्रिपुरामधील घटनेच्या निषेधार्थ काल झालेल्या हिंसाचारानंतर अमरावतीमध्ये बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र या बंदलाही हिंसक वळण लागलं होत. तसेच अनेक ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडलेल्या दिसून आल्या होत्या. सकाळी दहाच्या सुमारास जमाव मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरला. या जमावाने काही वेळातच दगडफेक आणि घोषणाबाजी सुरु केली. या जमावाला नियंत्रित करण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

याच पार्श्वभूमीवर आता शहर पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी सांगितले की, हिंसाचाराला चिथावणी देणार्‍या अफवा पसरू नयेत म्हणून इंटरनेट सेवा तीन दिवस बंद ठेवली जाईल. अमरावतीतील राजकमल चौक परिसरात शनिवारी सकाळी शेकडो लोक बाहेर पडले आणि अनेकांनी भगवे झेंडे हातात घेतले होते.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments