R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपत फूट तीन हजार एसटी कर्मचारी कामावर परतले !

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपत फूट तीन हजार एसटी कर्मचारी कामावर परतले !

 

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर एसटी कर्मचारी पुन्हा कामावर परतत आहेत. शनिवारी ही तीन हजार कर्मचारी कामावर परतले आहेत. शनिवारी २० वेगवेगळ्या ठिकाणांहून ७१ बस सोडण्यात आल्या असून दोन हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संप विरोधात एसटी महामंडळाने उच्च न्यायालय आणि औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर परतण्याचे आवाहन केले होते. मात्र, तरीही कर्मचारी आंदोलनावर ठाम राहिले आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यातील खासगी बस संघटनांना राज्यातील विविध बस स्थानकाहून बस गाड्या सोडण्याची परवानगी देण्यात आली होती.

जे एसटी कर्मचारी कामावर येण्यास तयार आहेत. त्यांनाही पोलीस संरक्षण देऊन तीन हजार कर्मचारी शनिवारी कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे शनिवारी राज्यभरातील २० ठिकाणाहून एकूण ७१ बस सोडण्यात आल्या आहेत. या बसमधून १ हजार ९३६ प्रवाशांनी प्रवास केला आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments