R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या आनंदवार्ता | शंभर टक्के मुंबईकरांनी घेतला लसीचा पहिला डोस

आनंदवार्ता | शंभर टक्के मुंबईकरांनी घेतला लसीचा पहिला डोस

 

मुंबई | कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत शंभर टक्के मुंबईकरांना पहिला डोस देण्याचे लक्ष्य मुंबई महानगर महापालिकेने पूर्ण केले आहे. शनिवारी दुपारीपर्यंत एकूण ९२ लाख ३९ हजार ९०२ नागरिकांनी पहिला डोस घेतल्याची नोंद ‘कोविन’ ॲपवर झाली आहे. तर ५९ लाख ८३ हजार ४५२ नागरिकांंनी दोन्ही डोस घेतलेे आहेत. लस घेणाऱ्यांमध्ये मुंबईबाहेरील नागरिकांचाही समावेश आहे.

मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. १८ वर्षांवरील एकूण ९२ लाख ३६ हजार ५०० लाभार्थी आहेत. पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवक, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस देण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेले, गर्भवती महिला, स्तनदा माता, अंथरुणाला खिळलेले रुग्ण अशा सर्वांचेच लसीकरण टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले. या लसीकरण मोहिमेत पालिका आणि सरकारी केंद्रांबरोबरच खाजगी रुग्णालयांनीही मोठे योगदान दिले.

लसीकरण मोहिमेच्या मार्गात महापालिकेला अनेक अडचणीचा सामना करावा लागला होता. कोविन ॲपमधील गोंधळ, लसींच्या अपुऱ्या साठ्याअभावी थंडावणारी मोहीम, जागतिक स्तरावर निविदा मागवून लस खरेदी करण्यात आलेल्या अपयशाला सामोरे जावे लागले होते. तरीही मोहीम सुरू राहिल्याने अखेर ११ महिन्यांमध्ये महापालिकेने पहिल्या डोसची शंभरी गाठली आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments