R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या नक्षलींचा खात्मा करणाऱ्या पोलिसांचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन !

नक्षलींचा खात्मा करणाऱ्या पोलिसांचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन !

 

मुंबई | गडचिरोलीतील नक्षली चकमकीत सहभागी झालेल्या पोलिसांचे सर्व स्थरातून आता कौतुक होताना दिसून येत आहे. तसेच त्या सर्व पोलिसांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्यांना बक्षीस दिले जाणार असल्याची माहिती गडचिरोली तसेच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात दिली.

मागच्या काही वर्षामध्ये गडचिरोलीच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासनाने ठोस पावले उचलली असून हा जिल्हा नक्षलवाद्यांच्या प्रभावापासून दूर जाऊन विकासाच्या मुख्य प्रवाहाकडे मार्गक्रमण करीत आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनासाठी दहा कोटींची तरतूद केल्याचेही पालकमंत्री एकनाथ शिंद यांनी स्पष्ट केले.

छत्तीसगढच्या सीमेवरील गडचिरोलीमध्ये झालेली चकमक सुमारे दहा तास सुरू होती. या कारवाईची सर्वच राज्यांनी दखल घेतली आहे. या चकमकीत माओवादी संघटनेच्या सेंट्रल झोन कमिटीचा सदस्य मिलिंद तेलतुंबडेसह २६ नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. गेल्या काही दिवसांमधील नक्षलविरोधी कारवायांमधील ही एक मोठी कारवाई आहे. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह सी ६० कमांडोंचे या वेळी शिंदे यांनी अभिनंदन केले. चकमकीत जखमी झालेल्या पोलिसांच्या उपचारामध्ये कोणतीही कमतरता ठेवणार नसल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments