R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश जातियवादी शक्तींना आता रोखले पाहिजे- नसीम खान

जातियवादी शक्तींना आता रोखले पाहिजे- नसीम खान

 

ठाणे | केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने महागाई वाढवून अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. देशात जातीयवादी शक्ती सक्रिय झाल्या आहेत. जनतेनेच अशा जातीयवादी शक्तीला रोखले पाहिजे, असे उद्गार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा राज्याचे माजी मंत्री नसीम खान यांनी रविवारी ठाण्यात केले.

संपूर्ण महाराष्ट्रात १४ ते २९ नोव्हेंबरपर्यंत राज्यव्यापी जनजागरण अभियानाचा प्रारंभ पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण नसीम खान यांच्या हस्ते करण्यात आला. येणाऱ्या आगामी ठाणे महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे पहिले जात आहे.

याप्रसंगी ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. विक्रांत चव्हाण, ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरेश ठाणेकर, प्रदेश काँग्रेस सचिव अनिस कुरेशी, महेश कांबळे, मोहन तिवारी, सुखदेव घोलप आदी पदाधिकारी उपस्थित होते. संविधान दिनी म्हणजेच २९ नोव्हेंबरपर्यंत हे जनजागरण अभियान विविध भागांत राबविण्यात येणार आहे. या अभियानात प्रामुख्याने वाढती महागाई, वाढती बेरोजगारी बाबत जनतेमध्ये जाऊन जनजागरण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले

 

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

स्वच्छ सर्वेक्षणात बदलापूर अव्वल, राज्यात दुसरा,देशात १४वा क्रमांक

बदलापूर | स्वच्छ सर्वेक्षणात भरारी घेत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा राज्यातून दुसरा, तर देशातून १४वा क्रमांक पटकावला आहे. तीन वर्षांत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने स्वच्छ...

“निवडणुका झाल्या तरी जनतेचा कौल महाविकास आघाडीलाच मिळेल”

  मुंबई |  राज्यात आघाडीचे सरकार कोसळेल अशी भविष्यवाणी सतत विरोधक करताना दिसून येत आहे. त्यातच आता सरकार आज पडणार, उद्या पडणार अशी दिवास्वप्ने वीरोधकांनी...

पाचवी व सहावी रेल्वे मार्गिका लवकरच सेवेत

  डोंबिवली : मुंब्रा-कळवा दरम्यानच्या नव्या पाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पूर्ण झालेल्या कामांची अंतिम चाचपणी सुरू असून हे काम पूर्ण...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

Recent Comments