R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या विक्रम गोखले यांच्या विधानावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रतिक्रिया !

विक्रम गोखले यांच्या विधानावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रतिक्रिया !

 

अभिनेते विक्रम गोखले यांनी काल एका कार्यक्रमातून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मोठं भाष्य केलं होत तसेच कांगांच्या विधानाला समर्थन सुद्धा दिले होते. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची चर्चाही झाली होती. त्यावरुन त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात आले होते. याशिवाय आणि शिवसेना भाजप युतीविषयी टिप्पणी केली होती. यासगळ्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विक्रम गोखले यांनी केलेली वक्तव्ये चर्चेत आली आहे. ते म्हणाले होते की, कंगनानं देशाच्या स्वातंत्र्याविषयी जे वक्तव्य केलं ते बरोबर आहे. त्याला माझे समर्थन आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या व्यक्तींनी बलिदान दिलं त्यापासून त्यांना रोखता आले असते. मात्र त्यावेळच्या काही नेत्यांमुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला. याशिवाय सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवरही गोखले यांनी वक्तव्य केले. भाजप आणि शिवसेना यांनी येत्या काळात एकत्र यायला हवे. काळाची ती गरज आहे. राज्याच्या भवितव्यासाठी त्यांनी एकत्र येणं महत्वाचे आहे. असे गोखले म्हणाले होते.

गोखले यांच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, अशा लोकांच्या वक्तव्याची नोंद घ्यावी असं मला वाटत नाही. असे लोक समाजात असतात. महाविकास आघाडी सरकारविषयी बोलताना पवार यांनी सांगितलं की, आम्ही जर ठरवून घेतलं आहे की जुळवून घ्यायचं त्यामुळे हे सरकार सुरू आहे. आज सरकार जाईल उद्या जाईल दिवस मोजायचं काम त्यांना करावं लागेल. महाविकास आघाडी सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments