R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या आमच्या जिल्ह्याबद्दल बोलण्याचे तुम्हाला निमंत्रण दिले नाही, खासदार राणा यांचा राऊतांना टोला...

आमच्या जिल्ह्याबद्दल बोलण्याचे तुम्हाला निमंत्रण दिले नाही, खासदार राणा यांचा राऊतांना टोला !

 

अमरावती | शिवसेनेचे खासदार संजय राऊत अमरावतीबद्दल बोलत आहेत. ते कोणत्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात. माझ्या अमरावतीच्या लोकांबद्दल तुम्ही कशी प्रतिक्रिया देत आहात? आम्ही आमच्या जिल्ह्याबद्दल बोलण्याचं तम्हाला निमंत्रण दिल नाही. तुम्ही तुमचं काम करा जे तुम्हाला बरोबर येत नाही, ते आधी शिकून घ्या, अशा शब्दांत खासदार नवनीत राणा यांनी शिसवेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

अमरावतीत झालेल्या हिंसाचारानंतर खासदार नवनीत राणा यांनी पाहणी केली. यावेळी ठकरे सरकारवर टीका करताना खासदार राणा म्हणाल्या की, अमरावतीतील हिंसाचार यंत्रणेचे अपयश आहे. आमच्या अमरावती जिल्ह्यात असं कधीही घडल नाही. पहिल्यांदा अशी घटना घडली. त्यामुळे मला खूप दु:ख वाटत आहे. या हिंसाचारात जे जखमी झाले तसेच ज्यांचे नुकसान झाले त्यांना सरकारने भरपाई द्यावी. यामध्ये काही राजकीय लोक आपले हात धूऊन घेत आहेत.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, देशातील बाकी राज्याचं आमच्या जिल्ह्याशी काय घेण-देण आहे. ही घटना हाताळण्यात तुम्ही अपयशी ठरले आहात अशी टीका राणा यांनी राज्य सरकारवर केली.अमरावती शहरात शनिवारी सलग दुसºया दिवशी दगडफेक, जाळपोळ झाल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे बेमुदत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

भाजपाने पुकारलेल्या बंददरम्यान समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत पाच पोलिसांसह नऊ जखमी झाले. शहरातील काही धार्मिक स्थळांसमोर नासधूस करण्यात आल्याने वातावरण चिघळले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला. दरम्यान, प्रशासनाने ४ दिवसांसाठी कर्फ्यू लागू केला आहे. अफवा पसरवण्यावर नियंत्रण आणण्यासाठी शहरातील इंटरनेट सेवा देखील खंडीत करण्यात आली.

अमरावती शहराच्या पश्चिमेकडील नमुना, सराफा बाजार, सक्करसाथ या भागांत दोन गट समारोसमोर आल्याने काही काळ बिकट स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments