R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home मनोरंजन वाढदिवसानिमित्त संजय राऊत यांना मुलीकडून खास हटके शुभेच्छा !

वाढदिवसानिमित्त संजय राऊत यांना मुलीकडून खास हटके शुभेच्छा !

 

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांचा आज ६० वा वाढदिवस साजरा होत आहे. तसेच आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून संजय राऊत यांचे राजकीय वजन काही प्रमाणात वाढलेले दिसून येत आहे. त्यातच नवी दिल्लीत राहुल गांधी यांच्याबरोबर त्यांची वदलेली जवळीक सध्या संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेत आहे. खासदार संजय राऊत कायमच आपल्या रोखठोक बोलण्यामुळे ओळखले जातात. पण या तडफदार बोलणाऱ्या संजय राऊतांना लेकीने वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

पूर्वशी राऊत हीने आपल्या खास शैलीत वडील संजय राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचप्रमाणे तिने यातून संजय राऊतांना प्रेमाचा सल्ला देखील दिला आहे. नुकतंच पूर्वशीचं लग्न झालं आहे. त्यामुळे सासरी गेलेल्या लेकीच्या शुभेच्छा संजय राऊतांसाठी देखील खास आहेत.

पूर्वशी राऊतची भावनिक पोस्ट

पूर्वशी आपल्या पोस्टमध्ये म्हणते,’ज्यांच्या असण्याने सगळीकडे आनंद पसरतो आणि ज्यांच्या आठवणी अतिशय उबदार आणि प्रेमळ आहेत. त्या बाबांना भरपूर यश, उत्तम आरोग्य आणि शून्य तणावाच्या शुभेच्छा!! आजचा दिवस तुमच्यासाठी अधिक प्रकाशाचा असो. आमच्या सुर्यमालेतील तुम्ही तळपता सूर्य आहात. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

या पोस्टमध्ये पूर्वशीने खास फोटो शेअर केला आहे. पूर्वशीच्या साखरपुड्यातील हा फोटो आहे. काही दिवसांपूर्वी पुर्वशीने आपल्या फेसबूक अकाऊंटवर वडिलांचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात संजय राऊत चक्क पेटी वाजवताना दिसत आहे. ‘सामना’चे संपादक म्हणून, शिवसेना नेता म्हणून संजय राऊत केवळ फटकारे मारतात असा एक गैरसमज आहे. ते रूक्ष असावे असे अनेकदा अनेकांनी म्हटले आहे. पण ते तसे नाहीत. ते राजकारणापलीकडे वाचतात , ऐकतात आणि बोलतात, असंही पुर्वशी हिने म्हटल होतं.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

अंकिताची लगीनघाई, या ठिकाणी होणार शाही विवाह सोहळा

  पवित्र रिश्ता या कार्यक्रमातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री आणि टीव्ही कलाकार प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेचा लवकरच विवाह सोहळा पार पडणार आहे. अंकिता विक्की जैन सोबत...

“बिग बॉसमध्ये जाण्यामुळे वारकरी संप्रदाय दुखावला असेल तर मी माफी मागते”

  'बिग बॉस'मध्ये जाण्यामुळे वारकरी संप्रदाय दुखावला असेल तर मी माफी मागते मात्र तेथे जाण्याचा माझा मार्ग चुकला असला तरी हेतू प्रामाणिक होता. यापुढे मात्र...

” भाजप नेत्याकडून महात्मा गांधी आणि राखी सावंतची तुलना”

  नवी दिल्ली | महात्मा गांधी कमी कपडे घालायचे परंतु कमी कपडे घातल्याने कोणी महान होत असेल तर राखी सावंत महान झाली असती असे वादग्रस्त...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments