R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने एक महान कर्मयोगी हरपले - देवेंद्र फडणवीस

बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने एक महान कर्मयोगी हरपले – देवेंद्र फडणवीस

 

प्रख्यात शिवशाहीर, महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण, सिद्धहस्त लेखक शतायुषी बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने एक महान कर्मयोगी, तपस्वी व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशी शोकसंवेदना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

बाबासाहेब पुरंदरे हे आज आपल्यातून निघून गेले, या बातमीवर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मनाला अतिशय वेदना झाल्या आणि त्यांच्या आठवणी, त्यांच्या सहवासात घालविलेले प्रत्येक क्षण डोळ्यापुढे येत आहेत. माझ्यासाठी तर ते व्यक्तिगत नुकसान आहे. एक मोठा आधारस्तंभ आपण सर्वांनीच गमावला आहे, असे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तब्बल तीन पिढ्यांना त्यांच्याकडून शिवचरित्र ऐकायला आणि वाचायला मिळाले, हे आमच्या पिढीचे भाग्यच आहे.

नुकतेच त्यांचे 100 व्या वर्षात पदार्पण झाले, तेव्हा त्या सोहोळ्याला आभासी पद्धतीने उपस्थित राहण्याचा योग आला आणि आज ते आपल्यात नाहीत, यावर विश्वासच बसत नाही. त्यानंतर राजभवन येथील कार्यक्रमात प्रत्यक्ष भेट सुद्धा झाली होती. संपूर्ण शिवचरित्र त्यांचे बालपणीच ऐकून झालेले होते आणि त्यांनी शिवशौर्याचे धडे देणे सुरू केले. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने एक अमोघ व्यक्तिमत्त्व, एक ज्येष्ठ इतिहासकार, संशोधक हरपला आहे. ‘राजा शिवछत्रपती’सारखा चरित्रात्मक ग्रंथ असो किंवा ‘जाणता राजा’ सारखे महानाट्य हा त्यांनी आपल्याला दिलेला फार मोठा आणि अमूल्य ठेवा होय.

बाबासाहेबांची सर्वांत मोठी ओळख कोणती तर त्यांनी कधीही इतिहास मोडून-तोडून सांगितला नाही. त्यांनी इतिहासावर निस्सिम प्रेम केले आणि श्रद्धाही जोपासली. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित प्रत्येक तारीख, प्रसंग मुखोदगत असलेले बाबासाहेब होते. जणू शिवकाळ हाच त्यांचा श्वास, तोच त्यांचा प्राण होता. ध्येयाप्रति समर्पित व्यक्तिमत्त्व, वेळ आणि शब्दांचे पक्के, सतत राष्ट्रनिर्माणाचा विचार, संस्कारक्षम पिढी घडली पाहिजे यासाठी कठोर परिश्रम घेणारे असे बाबासाहेब पुरंदरे आता पुन्हा होणे नाही.

आज त्यांच्या निधनाने शिवछत्रपतींचे एक सच्चे सेवक, एक निष्काम कर्मयोगी आपल्यातून निघून गेले. बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन ही संपूर्ण समाजाची हानी आहे. येणार्‍या अनेक पिढ्या त्यांच्या कार्यातून संस्कार, विचार, प्रेरणा घेतील. आज प्रवासामुळे त्यांच्या अंत्यसंस्कारला मला पुण्यात उपस्थित राहता आले नाही, याचीही खंत आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती महाराष्ट्राला मिळो, अशी प्रार्थना करतो, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments