R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर मुंबईत ४ महिने भाड्याच्या घरात राहिलो, मग..";

“मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर मुंबईत ४ महिने भाड्याच्या घरात राहिलो, मग..”;

 

मुंबई | महाराष्ट्रात सरकारचं कुठेही अस्तित्व दिसत नाही. प्रत्येक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री मानतो. राज्यातील जनता होरपळत आहे. पण त्यांच्या प्रश्नाकडे पाहण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. जनतेचा विचार करत नाही. उद्धव ठाकरेंना कुणीही मुख्यमंत्री मानायला तयार नाही. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून महाविकास आघाडी सरकारचं नाव लिहिलं जाईल असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

भाजपाच्या कार्यकारणीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशद्रोह्यांसोबत पार्टनरशिप या राज्याचा मंत्री करतो. एकदा भ्रष्टमार्गाने चालण्याची सवय नोकरशाहीला लागली तर ती पुन्हा पुर्वपदावर लवकर येत नाही. ज्या बदल्या केल्या जात आहेत. कोटी कोटी देऊन बदल्या पोस्टिंग केली जात आहे. आपल्या काळात जलयुक्त शिवार, मेट्रो, डिजिटल इंडिया, उद्योगावर चर्चा करायची. पण या सरकारच्या काळात हर्बल तंबाखू, वसुली, स्थगिती, बलात्कार, खंडणी यावर चर्चा होते अशी टीका त्यांनी केली होती.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारचं नाव लिहिलं जाईल. प्रत्येक विभागात एक वाझे आहे. सरकार सामान्यांसाठी नव्हे तर ते कायद्याचे नाही तर काय द्यायचे राज्य सुरु आहे. हजारो कोटींची वाटमारी सरकारकडून सुरु आहे. पण सामान्य शेतकऱ्यांकडे पाहायला कुणी तयार नाही असं त्यांनी सांगितले.

ही लढाई समोरुन लढावी लागते. पूर्ण ताकदीनं लढावी लागते. आम्हाला कुणालाही घाबरण्याचं कारण नाही. आमच्याकडे इनामी नाही आणि बेनामीही नाही. आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. ज्या दिवशी मुख्यमंत्रिपद सोडलं. ५ वर्षांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडलो त्यानंतर मुंबईत घर नव्हतं. ४ महिने भाड्यानं घर घेऊन राहिलो. विरोधी पक्षनेत्याचं निवासस्थान मिळेपर्यंत भाड्याच्या खोलीत राहिलो असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी मंत्री नवाब मलिकांना दिलं आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments