R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देण्यासाठी शिवतीर्थावर आज उसळणार शिवसैनिकांचा जनसागर!

शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देण्यासाठी शिवतीर्थावर आज उसळणार शिवसैनिकांचा जनसागर!

 

मुंबई | ‘गर्व से कहो हम हिंदू है’ अशी घोषणा देत अखंड हिंदुस्थानात हिंदुत्वाचा अंगार शिवसं प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी फुलवला. आज देव, देश आणि धर्मासाठी सर्वस्वाचा त्याग करून जनकल्याणार्थ झोकून देणारी पिढी त्यांच्या विचाराने निर्माण झाली. १७ नोव्हेंबर हा शिवसेनाप्रमुखांचा महानिर्वाण दिन. आपल्या साहेबांना मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱयातील शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींचा जनसागर बुधवारी शिवतीर्थावर उसळणार आहे.

शिवसेनाप्रमुख म्हणजे साक्षात हिंदुत्वाचे धगधगते अग्निकुंड. मराठी माणसामध्ये त्यांनी स्वाभिमान केवळ जागृतच केला नाही तर तो त्यांच्या नसानसात भिनवला. साहेबांच्या विचारांनी मराठी माणूस आणि हिंदूंच्या मनगटात ताकत दिली. अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची ऊर्मी निर्माण केली. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी हे शिवतेज अनंतात विलीन झाले.

मात्र आजही शिवसेनाप्रमुखांचे ज्वलंत विचार आजही प्रेरणा देत आहेत, स्फूर्ती देत आहेत. वर्तमानाला इतिहास घडवण्याचे सामर्थ्य देत आहेत. निर्भिडपणे जगायला शिकवत आहेत. अशा प्रेरणादायी, स्फूर्तिदायी, सामर्थ्यदायी हिंदूतेजासमोर नतमस्तक होण्यासाठी उद्या सारा हिंदुस्थान शिवतीर्थावरील शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळी दाखल होणार आहे.

२०१२नंतर दरवर्षी १७ नोव्हेंबरला शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळावर अलोट जनसागर मानवंदना द्यायला येतो. गतवर्षी कोरोना संकटामुळे बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवतीर्थावर जाता आले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे निवडक नेते आणि पदाधिकाऱयांच्या उपस्थितीत शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळी आदरांजली अर्पण केली.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments