R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या धक्कदायक | निलंबनाच्या भीतीने एसटी कर्मचाऱ्याने घेतलं विष !

धक्कदायक | निलंबनाच्या भीतीने एसटी कर्मचाऱ्याने घेतलं विष !

 

मुंबई | एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी मागच्या दोन आठवड्यापासून आंदोलन करत असून हे आंदोलन अधिक चिघळताना दिसून येत आहे. त्यातच याच मुद्द्यावरून परिवहन मंडळाने कामावर नऊ न होणाऱ्या कर्मचारी वर्गावर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच अनेकांचे निलंबन सुद्धा करण्यात आलेले आहे.

त्यातच निलंबनाच्या याच भीतीतून बुलढाणा जिल्ह्यात संपात सहभागी झालेल्या एका एसटी कर्मचाऱ्याने विषारी द्रव्य प्राशन केल्याची घटना घडली आहे. त्याला उपचारासाठी अकोल्याला हलवण्यात आलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव डेपोमध्ये कार्यरत असलेल्या विशाल प्रकाश अंबळकार यांनी निलंबनच्या चिंतेतून विष प्राशन केल्याचं त्यांच्या वडिलांनी सांगितलं. विशाल अंबळकार गेल्या ११ दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी झालेले आहेत.

संपात सहभागी झालेल्या आणि कामावर परतण्यास इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांना विरोध करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. निलंबनाच्या याच चिंतेतून 29 वर्षीय विशाल अंबळकार यांनी विष प्राशन केलं. माटरगावमधील राहत्या घरात त्यांनी विष प्राशन केलं. त्यानंतर याची माहिती त्यांनी वडिलांना दिली. त्यानंतर त्यांना तातडीने खामगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. पण, प्रकृती ढासळल्याने त्यांना अकोला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं.

विशाल अंबळकार यांच्या वडिलांनी या घटनेबद्दलची माहिती दिली. निलंबनाच्या भीतीमुळे तो मागच्या ४ दिवसांपासून चिंतेत होता. याचं चिेंतेतून त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. माझी सरकारला विनंती आहे की, एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाची पावलं उचलू नयेत म्हणून त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली. विशालच्या पगारावरच त्याच्या घराचा उदरनिर्वाह चालतो.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments