R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या ठाण्यात मनपा निवडणुकांची तयारी जोरदार सुरु

ठाण्यात मनपा निवडणुकांची तयारी जोरदार सुरु

 

ठाणे : महापालिका निवडणुका पुढील वर्षांच्या फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये निवडणुका होण्याचा अंदाज बांधत प्रशासनाने निवडणुकीच्या कामाला सुरुवात केली असून त्यासाठी निवडणुकीच्या कामाचा अनुभव असलेल्या लिपिकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कच्ची प्रारूप प्रभाग रचना करण्याचेही काम सुरू केले आहे.

राज्यातील पंचवार्षिक मुदत संपलेल्या महापालिकांच्या निवडणुका पुढच्या वर्षी होणार आहेत. त्यामध्ये ठाणे महापालिकेचाही समावेश आहे. ही निवडणूक बहु सदस्य पद्धतीने होणार असून त्याप्रमाणे कच्ची प्रारूप प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच दिले होते. या आदेशानुसार ३० नोव्हेंबपर्यंत कच्ची प्रारूप प्रभाग रचना करावी लागणार असल्याने पालिकेने गेल्या काही दिवसांपासून या कामाला सुरुवात केली आहे.

सदर काम महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीकडून करण्यात येत आहे. या समितीकडून यापूर्वी एक सदस्य पद्धतीने कच्ची प्रभाग रचना करण्याचे काम करण्यात आले होते. ही रचना बदलून समितीकडून आता तीन सदस्य पद्धतीने प्रभाग रचना करण्याचे काम सुरू आहे. या प्रभाग रचनेकडे सर्वाचे लक्ष लागले असून इच्छुक उमेदवारांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments