R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूल सुरु करण्याच्या हालचाली

कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूल सुरु करण्याच्या हालचाली

 

कल्याण | भाजपचा दबदबा असलेल्या डोंबिवलीत विकासकामांचा धडाका लावत शिवसेनेने येत्या महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मोठागाव खाडीवरील माणकोली पूल खुला करण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. ठाणे-डोंबिवली यांच्यातील अंतर कमी करणाऱ्या या पुलामुळे कल्याण-शिळ रस्त्यावरील कोंडी कमी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन या पुलाची प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करावीत असे स्पष्ट आदेश मुंबई महानगर विकास प्राधिकरणास देण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिका तसेच अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. याच मतदारसंघाचा भाग असलेल्या कळवा-मुंब्रा तसेच दिवा या ठाणे महापालिका हद्दीत मोडणाऱ्या परिसरातही निवडणुका होणार आहेत. त्यामुळे खासदार शिंदे यांच्यासाठी या निवडणुका अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत. ठाणे महापालिका हद्दीतील भाजपच्या तुलनेत शिवसेनेची ताकद बरीच मोठी आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत मात्र शिवसेनेपुढे यंदा भाजपचे तोडीस तोड आव्हान आहे.

डोंबिवली आणि कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत तर कल्याण ग्रामीण मतदारसंघात महाराष्ट्र नवनिमाण सेनेचे राजू पाटील निवडून आले आहेत. हे लक्षात घेता शिवसेनेने ही निवडणूक आतापासूनच गांभीर्याने घेतली असून वेगवेगळय़ा विकासकामांच्या माध्यमातून पक्षासाठी पोषक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.

कल्याण, डोंबिवलीतील महत्त्वाचे पूल सुरू करून शिवसेनेने शहरवासीयांना खूश करण्याचा धडाका लावला असताना येत्या काळात माणकोली उड्डाणपुलावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. डोंबिवलीकरांची शिळफाटा, कोन-भिवंडी येथील वाहतूक कोंडीतून मुक्तता व्हावी यासाठी माणकोली उड्डाणपूल लवकरच खुला होणे आवश्यक आहे. येत्या मार्च-एप्रिल दरम्यान कल्याण-डोंबिवली पालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी माणकोली पूल खुला करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या आणि एमएमआरडीएकडून सुरू झाले आहेत.

महापालिका निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी कोपर, पत्रीपुलाबरोबर माणकोली पूल ठेवता येईल, अशी व्यूहरचना सेनेकडून आखली जात आहे. ‘एमएमआरडीए’चे नियंत्रक, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आहेत. या आयुधाचा पुरेपूर वापर करून सेनेने माणकोली पूल येत्या तीन महिन्यांत पूर्ण होईल यादृष्टीने प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना नगरविकास विभागाने कामाला लावले असल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले. याप्रकरणी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना सतत संपर्क करून, लघुसंदेश पाठवूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. खासदार डॉ. शिंदे यांनी मोठागाव पुलाची सविस्तर माहिती घेऊन बोलतो. आपण बाहेरगावी आहोत, असे सांगितले.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments