R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या बिग बॉस च्या घरात कोणी केला विश्वासघात ?

बिग बॉस च्या घरात कोणी केला विश्वासघात ?

मुंबई | बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सगळीच समीकरण बदलताना दिसत आहेत. नक्की कोण कोणाच्या बाजूने खेळत आहे, कोण कोणाचा दुश्मन आहे ?
कोणापासून धोका आहे ? हे सांगण जरा अवघड होऊन बसले आहे. प्रत्येकाला घरामध्ये टिकून राहायचे आहे आणि त्यामुळे प्रत्येक सदस्य त्याचा त्याचा गेम खेळतो आहे असे म्हणायला हरकत नाही. यामध्ये अगदी पहिल्या दिवसापासून मैत्रीच्या शपथा घेणारे सदस्य कुठवर ही मैत्री जपतील हे येणार्‍या दिवसांमध्ये कळणार आहेच.

ग्रुपमध्ये देखील आता फुट पडण्यास सुरुवात झाली आहे. विकास – विशालनंतर आता कुठेतरी मीरा आणि गायत्रीमध्ये देखील दुरावा येत आहे असे दिसते आहे. मग काल मीराने उत्कर्ष, दादूस आणि जयसमोर तिचे मनमोकळे करणे असो वा मग त्यांची आजची चर्चा असो. आता आजची ही चर्चा नक्की गायत्रीवरुनच आहे की मीरा आणि उत्कर्ष कोणा दूसर्‍या सदस्याबद्दल बोलत आहेत हे आजच्या भागामध्ये कळेलच.

उत्कर्ष आणि मीरा आज चर्चा करताना दिसणार आहेत. उत्कर्ष म्हणाला, मला म्हणे उत्कर्ष तरीपण तू खेळलास ना… मी म्हणालो, अगं मी खेळलोच नाही… हा अप घात होता. तुला पकडायचे असते तर मग मी कसेही पकडले असते. माझेच मित्र मला सांगत होते खेळ पण तरीदेखील मी खेळलो नाही… जयने मला उदाहरण दिले मस्त, बाहेरून कोणी आग लावायला आलं तर आपण बाहेर पहारा देऊ शकतो, वाचवू शकतो.

घरातच कोणी गॅस लावला तर ? विश्वासघात म्हणतात त्याला… मला त्याने तेव्हाच सांगितले होते की, ही तुम्हांला सगळ्यांना धोका होईल.” मीराचे म्हणणे आहे, विश्वासघात नाही तिला इनसिक्युरिटी आहे आणि चर्चा पुढे सुरू राहिली. पुढे या दोघांमध्ये अजून काय काय चर्चा झाली हे जाणून घेण्यासाठी बिग बॉस मराठी सिझन तिसऱ्या सीझनचा एपिसोड पाहावा लागेल.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

महानगरपालिका,नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

  मुंबई |  कोवीड-19 मुळे प्रशासकीय आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या, अशा परिस्थितीत पडताळणी समित्यांकडून केवळ जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्यामुळे उमेदवारांना, राखीव असलेल्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

Recent Comments