R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति भाजप नेत्याच्या 'त्या' वक्तव्यावर मंत्री एकनाथ शिंदे यांचे चोख प्रतिउत्तर

भाजप नेत्याच्या ‘त्या’ वक्तव्यावर मंत्री एकनाथ शिंदे यांचे चोख प्रतिउत्तर

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधात बसलेले भारतीय जनता पक्ष आघाडी सरकार आणि शिवसेना पक्षावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसून येत नाहीये. त्यातच पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला होता. महाराष्ट्राला उद्धव ठाकरेंसारखा पार्टटाईम नाही तर देवेंद्र फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री पाहिजे, उद्धव ठाकरे कधी उठतात, कधी झोपतात आणि कधी काम करतात हे सर्व जनतेला माहिती झाले आहे, असं वक्तव्य भाजपचे महाराष्ट्र प्रभारी आणि भाजप राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी यांनी काल केलं होतं. त्यावर आता शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

शिवसेना नेते व महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे दौऱ्यावर असताना भाजप राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता कोरोनाकाळात महाराष्ट्र सरकारने सुयोग्य नियोजन केल्याने न्यायालयासह पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कौतुक केलं असल्याचं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी सरचिटणीस सीटी रवी
यांना नाव न घेता दिले आहे.

एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार योग्य पद्धतीने काम करत आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपने आरोपांच्या फैरी झाडायला सुरूवात केली. परंतू, आम्ही त्या आरोपांकडे लक्ष देत नाही आणि कोरोना संकटाचा सामना करत आहोत व विकास कामंही करत आहोत, असं म्हणत त्यांनी सीटी रवी यांच्या वक्तव्यावरून भाजपवर पलटवार केला आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

ममता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटू शकणार नाहीत

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात त्या शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे...

२३ वर्षांत नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की… मालिकांची नारायण राणेंवर घणाघाती टीका

  मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र टीका करण्याचे एकही संधी सोडताना दिसून येत नाहीये....

एनसीबीची मोठी कारवाई; ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

  राज्यात ड्रग्स प्रकरण चांगलेच गाजत असताना एनसीबीची कारवाई सुरूच असलेली दिसून येत आहे त्यातच एनसीबी मुंबईने नांदेडमध्ये कारवाई करत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments