R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या यापुढे विक्रम गोखलेंसोबत काम करणार नाही...; मराठी निर्मात्याची जाहीर घोषणा

यापुढे विक्रम गोखलेंसोबत काम करणार नाही…; मराठी निर्मात्याची जाहीर घोषणा

 

मुंबई | भारताला १९४७ साली मिळालं ते स्वातंत्र्य भीक होती, खरं स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळालं, असं सिने-अभिनेत्री कंगना राणौत बरळली होती तिच्या या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला होता तसेच तिच्या या विधानाचे देशभर तीव्र पडसाद उमटले. त्यातच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी अचानक या वादात उडी घेतली. कंगनाच्या वक्तव्याचं समर्थन करते, कंगना जे बोलली ते खरं आहे. तिच्या मताशी मी सहमत आहे, असं म्हणून त्यांनी नवा वाद ओढवून घेतला. याच पार्श्वभूमीवर आता एका निर्मात्याने भविष्यात कधीही विक्रम गोखलेंसोबत काम न करण्याचं जाहीर केलं आहे.

होय, शाळा, फँड्री अशा गाजलेल्या चित्रपटांचे मराठमोळे निर्माते निलेश नवलाखा यांनी एक ट्विट करत याची घोषणा केली आहे. ‘मी विक्रम गोखलेंबरोबर काम केलं आहे, कलाकार म्हणून मला त्यांचा प्रचंड अभिमान आहे परंतु त्यांनी कंगना रानावत जे बोलली त्याचं समर्थन करणं म्हणजे महामूर्खपणा आहे. जे काही ते बोलले त्याचा मनापासून धिक्कार करतो व भविष्यात त्यांच्याबरोबर काम करणार नाही हे पण घोषित करतो,’ असं ट्विट नवलाखा यांनी केलं आहे.

देशाला मिळालेलं स्वातंत्र्य भीक होतं, असं कंगना म्हणाली होती. विक्रम गोखले यांनी कंगनाच्या या भूमिकेचं स्पष्ट शब्दांत समर्थन केलं होतं. कंगना जे म्हणाली आहे ते खरं आहे. ते स्वातंत्र्य भीक मागूनच मिळालेलं आहे यावर मी सहमत आहे. हे दिलं गेलेलं आहे बरं का? ज्या योद्ध्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला त्यांना फाशी देताना मोठे लोक बघत राहिले. त्यांना वाचवलं नाही. आपले लोक ब्रिटिशांविरोधात उभे आहेत हे पाहूनसुद्धा वाचवलं नाही, असं ते म्हणाले होते.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments