R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश कडबा कुट्टी मशीनमध्ये स्कार्फ अडकला, गळफास लागून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

कडबा कुट्टी मशीनमध्ये स्कार्फ अडकला, गळफास लागून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

 

जनावरांना चारा कटिंग मशीनमध्ये गळ्यातील स्कार्प आणि केस अडकल्यामुळे एका २१ वर्षीय नवविवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात घडली आहे. सहा महिन्यापूर्वीच या महिलेचं लग्न झालं होतं. तिच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव गावात ही दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना घडली. सोनाली अजय दौंड असं मृत नवविवाहितेचे नाव आहे.

जनावरांना चारा कटिंग करून घालण्याच्या कुट्टी मशीनमध्ये सोनालीचा गळ्यातील स्कार्प आणि केस गुंतले होते. यात सोनालीला गळफास लागल्याने दुर्दैवीरित्या मृत्यू झाला. नेहमीप्रमाणे सोनाली जनावरांसाठी कटिंग मशीनवर चारा काढत होती. पण, अचानक तिची ओढणी कटिंग मशीनमध्ये अडकली काही कळायच्या आता तिच्या मानेला हिसका बसला आणि केसही आत ओढली गेली.

त्यामुळे तिला गळफास बसला. घरातील सदस्यांनी तातडीने धाव घेऊन तिला मशीनपासून बाजूला केले. सासरे सुभाष दौंड हे सकाळी सकाळी ०९.४५ वाजेच्या सुमारास शेतात मेथीच्या भाजीला तननाशक फवारण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी रस्त्याने नवनाथ लक्ष्मण रोडे व वैभव रामदास पडवळ असे दोघे मोटार सायकलवर जात असताना सुभाष यांनी त्यांना काय झाले? असे विचारले त्यावेळी त्यांनी अजयच्या पत्नीचे केसं कडबा कुट्टी मशीनमध्ये गुंतले आहेत, असे सांगून ते पुढे निघून गेले. त्यामुळे सुभाष यांनी लगेच शेतातून घरी आले. त्यावेळी त्यांचा लहान भाऊ सुनील सोपान दौंड याने सोनालीला कडबा कुट्टी मशीनपासून घराच्या ओट्यावर आणले होते.

त्यावेळी सोनाली हीला पाहिले असता ती काही एक बोलत नव्हती. त्यावेळी तिला लगेच लहान भाऊ सुनिल दौंड व नवनाथ रोडे यांनी खाजगी गाडीने पारगांव इथं नेलं
तेथून पुढे रुग्णवाहिकेमधून उपचारकामी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय मंचर येथे आणले. मात्र तेथील डॉक्टरांनी सोनालीला तपासून मयत झाल्याचे घोषित केले. याबाबत आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील पोलीस ठाण्यात अकास्मात मयत अशी नोंद करण्यात आली आहे. सोनालीच्या अकास्मात मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

स्वच्छ सर्वेक्षणात बदलापूर अव्वल, राज्यात दुसरा,देशात १४वा क्रमांक

बदलापूर | स्वच्छ सर्वेक्षणात भरारी घेत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा राज्यातून दुसरा, तर देशातून १४वा क्रमांक पटकावला आहे. तीन वर्षांत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने स्वच्छ...

“निवडणुका झाल्या तरी जनतेचा कौल महाविकास आघाडीलाच मिळेल”

  मुंबई |  राज्यात आघाडीचे सरकार कोसळेल अशी भविष्यवाणी सतत विरोधक करताना दिसून येत आहे. त्यातच आता सरकार आज पडणार, उद्या पडणार अशी दिवास्वप्ने वीरोधकांनी...

पाचवी व सहावी रेल्वे मार्गिका लवकरच सेवेत

  डोंबिवली : मुंब्रा-कळवा दरम्यानच्या नव्या पाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पूर्ण झालेल्या कामांची अंतिम चाचपणी सुरू असून हे काम पूर्ण...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

Recent Comments