R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या तब्ब्ल दिड वर्षांनी ठाण्यातील नगरसेवक आज येणार आमने-सामने !

तब्ब्ल दिड वर्षांनी ठाण्यातील नगरसेवक आज येणार आमने-सामने !

 

ठाणे | कोरोनाकाळात ऑनलाईन चालणारी ठाणे महापालिकेची महासभा आज (गुरुवारी) प्रत्यक्ष भरणार आहे.पालिका मुख्यालयाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात कोविड नियमांचे पालन करून ही सभा होणार आहे. ऑनलाईन सभेत सत्ताधारी आवाज ‘म्यूट’ करून मुस्काटदाबी होत असल्याच्या तक्रारी आधीच विरोधी पक्षाने वेळोवेळी केल्या आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या प्रत्यक्ष महासभेत दीड वर्षानंतर नगरसेवक आमने-सामने येणार असून, त्यामुळे ही सभा गाजणार आहे.

मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पालिकेच्या स्थायी समितीसह सर्वसाधारण आणि महासभांना ब्रेक लगावला होता. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकासकामांसाठी या सभा अत्यावश्यक असल्याने सरकारने ऑनलाईन पद्धतीने त्या घेण्याची परवानगी दिली. मात्र ऑफलाईनपेक्षाही या ऑनलाईन सभा अनेक वेळा वादळी ठरल्या.

तसेच विरोधी पक्षातील नगरसेवकांना बोलू न देणे, त्यांचे आवाज ‘म्यूट’ करण्याच्या तक्रारी वाढल्या. त्यामुळे कोरोनाचा कहर टळू लागल्यावर सभा प्रत्यक्ष घेण्यात यावी, यासाठी विरोधी पक्षाने न्यायालयातही धाव घेतली. तरीही त्यावर तोडगा निघू शकला नव्हता. पण आता ‘अनलॉक-२’ नंतर जिथे सर्व व्यवहार सुरळीत आहेत, तिथे महासभाही प्रत्यक्ष घेण्यास हरकत नसल्याचे सांगत नगरविकास विभागाने त्याला परवानगी दिली आहे. त्यानुसार स्थायी समितीची बैठक गेल्या महिन्यात झाली असून,आज १८ नोव्हेंबरला महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

महानगरपालिका,नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

  मुंबई |  कोवीड-19 मुळे प्रशासकीय आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या, अशा परिस्थितीत पडताळणी समित्यांकडून केवळ जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्यामुळे उमेदवारांना, राखीव असलेल्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

Recent Comments