R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या घोडबंदर वासियांना मुबलक पाणी

घोडबंदर वासियांना मुबलक पाणी

 

ठाणे | नवीन ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर परिसराचे गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने नागरीकरण झाले असून या भागाला भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी कासारवडवली भागात उभारलेल्या पंप हाऊस आणि दोन जलकुभांचे पालिकेने नुकतेच लोकार्पण केले. नव्या जलकुंभाचा ८० हजार नागरिकांना होणार फायदा होणार असून त्याचबरोबर घोडबंदरवासीयांना नियमित आणि मुबलक पाणीही मिळणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

घोडबंदर परिसरातील वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत पाणीपुरवठ्याची मागणी मोठ्या प्रमाणात वादळी होती, तसेच पाणीपुरवठा कमी होत असल्याने गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे. अनेक गृहसंकुलांना टँकरचे पाणी खरेदी करून गरज भागवावी लागते. ही समस्या सोडवण्यासाठी ठाणे महापालिकेने कासारवडवली परिसरात पालिकेने दोन जलकुंभ आणि पंप हाऊस उभारले आहेत. या जलकुंभातून घोडबंदर भागाला प्रतिदिन १२ दशलक्षलिटर इतका पाणीपुरवठा होणार आहे. तसेच १५ दशलक्षलिटर क्षमतेच्या संपमधून १०० अश्वशक्तीच्या तीन पंपाद्वारे पाणी उचलण्यात येणार आहे.

या जलकुंभाचा लोकार्पण सोहळा महापौर नरेश म्हस्के आणि शिवसेना खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीत बुधवारी पार पडला. या दोन्ही जलकुंभामुळे घोडबंदर भागातील पाणी समस्या सुटण्यास मदत होणार आहे. यामध्ये हावरे सिटी, रौनक हाईट, रोझा गार्डनिया, पारिजात गार्डन, महावीर कल्पवृक्ष, पाचवड पाडा, पुराणिक टोक्यो बे, वेदांत हॉस्पिटल, विहंग व्हॅली, उन्नती ग्रीन, प्लॅटिनम लॉन्स, कॉसमॉस ज्वेल्स, पार्क वुड, युनिक ग्रीन, साईनगर, भक्तीपार्क, ऋतू एन्क्लेव्ह, संघवी हिल्स, ग्रीन स्क्वेअर, ग्रॅण्ड स्क्वेअर सुदर्शन स्काय गार्डन या भागातील ८० हजार नागरिकांना याचा फायदा होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments