R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश "एक रुपयाचा जरी गैरव्यवहार केल्याचं कोणी सिद्ध केले तर राजकारणातून सन्यास घेईल"

“एक रुपयाचा जरी गैरव्यवहार केल्याचं कोणी सिद्ध केले तर राजकारणातून सन्यास घेईल”

 

जळगाव | जळगाव जिल्हा बँकेत मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा विरोधकांचा आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी खोडून काढला आहे. एक रुपयाचा जरी आपण गैरव्यवहार केल्याचे कोणी सिद्ध करून दाखवले तर आपण राजकारणातून कायमचा संन्यास घेऊ, असे प्रतिआव्हान विरोधकांना दिले आहे. विरोधकांकडून सध्या जे काही सुरू आहे तर फक्त आपली छळवणूक करण्यासाठी सुरू आहे, आपण कोणताही गैरव्यवहार केलेला नसल्याने तुम्ही ईडी लावा अथवा काय लावायचा ते लावा आपलं थेट आव्हान आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटलेय.

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल जळगाव येथे महाविकास आघाडीचे सहकार पॅनलचा प्रचार दौरा होता. या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने अध्यक्षीय भाषण करताना एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. खडसे यांनी रास्तवडीत प्रवेश केल्यापासून माजी मंत्री गिरीश महाजन हे खडसे यांचयव्हर टीका करत असल्याचे दिसून आले आहेत.

मागील सहा वर्षांच्या पूर्वीचा जिल्हा बँकेचा कारभार पाहिला तर जिल्हा बँक अवसायनात जाण्याच्या मार्गावर होती, मात्र रोहिणी खडसे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर अतिशय काटकसरीचे आणि नियोजन पूर्वक धोरण जिल्हा बँकेने राबविले असल्याने जिल्हा बँक चांगले काम करणाऱ्या देशातील पहिल्या दहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे, असे ते म्हणाले. आगामी काळात अजूनही ही बँक चांगल्या प्रकारे काम करणार आहे, असे खडसे यांनी सांगितले.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

स्मार्ट सिटीतील गैरव्यवहारांची केंद्र सरकारकडून चौकशी केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे आदेश

  ठाणे | ठाणे शहरात राबविण्यात आलेल्या स्मार्ट सिटी योजनेतील गैरव्यवहारांची केंद्र सरकारकडून चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज दिले...

आशिष शेलारांच्या वक्तव्यावर शिवसेना पक्ष आक्रमक होताच, भाजपाची माघार

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सेनेच्या नगरसेवकांनी पोलिसांकडे धाव घेत...

श्रीमंत कोकाटे म्हणतात, नाशिकवर पहिला हक्क शूर्पणखेचा तर भातखळकर म्हणतात,

मुंबई | नाशिकचा पाया खऱ्या अर्थाने शूर्पणखेने घातल्याचा दावा इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांनी केला होता. मात्र या दवयवरून त्यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात आली होती...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments