R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या " भाजपा, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सूडबुद्धीने वागवू नका"

” भाजपा, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सूडबुद्धीने वागवू नका”

मुंबई | अमरावती, नांदेड, मालेगाव या ठिकाणी झालेल्या दंगली राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडीच्या आशीर्वादाने झाल्या आहेत. १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या दंगलीच्या सूत्रधारांना जेरबंद करण्याऐवजी भाजपा तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने खटले दाखल केले जात आहेत. प्रशासनाने भाजपा कार्यकर्त्याना खोटया नाट्या गुन्ह्याखाली अडकवणे थांबवावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी बुधवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. भांडारी बोलत होते. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष एजाज देशमुख यावेळी उपस्थित होते.

भांडारी यांनी यावेळी राज्यात नुकत्याच झालेल्या धार्मिक दंगली संदर्भात राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. १२ नोव्हेंबर रोजी अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोर्चे काढण्यासाठी कोणत्या संघटनांनी स्थानिक प्रशासनाकडे अधिकृत परवानगी मागितली असल्यास त्याबाबतची कागदपत्रे सरकारने जनतेपुढे ठेवावीत, या मोर्चांमध्ये किती संख्येने लोक सहभागी होतील याची माहिती प्रशासनाकडे आली असेल तर तीही प्रसिद्ध करावी तसेच अमरावतीत अटक केलेल्या सर्वांची नावे आणि त्यांचे राष्ट्रीयत्व जाहीर करा, अशा मागण्या भांडारी यांनी यावेळी केल्या.

मालेगाव येथे दंगल प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला अटक झाली का याची माहितीही सरकारने जाहीर करावी असे ही माधव भांडारी यांनी सांगितले. नांदेड येथे अटक केलेला एक दंगलखोर पोलिसांच्या तावडीतून पळाला आहे. अजूनही पोलीस त्याला पकडू शकले नाहीत, अशी माहितीही त्यांनी दिली.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments