R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home खेळ टीम इंडियाच्या टी20 टीमचा कॅप्टन रोहित शर्मानं त्याच्या नव्या इनिंगला केली सुरवात

टीम इंडियाच्या टी20 टीमचा कॅप्टन रोहित शर्मानं त्याच्या नव्या इनिंगला केली सुरवात

 

टीम इंडियाच्या टी20 टीमचा कॅप्टन रोहित शर्मानं त्याच्या नव्या इनिंगला केली सुरवात केली असून बुधवारी न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये टीम इंडियानं ५ विकेट्सनं विजय मिळवला. या मॅचमध्ये रोहितनं ३६ बॉलमध्ये ४८ रनची खेळी करत विजयाचा पाया रचला. टीम इंडियाच्या टी20 टीमचा पूर्णवेळ कॅप्टन म्हणून रोहितची ही पहिलीच मॅच होती. असं असलं तरी भारतीय क्रिकेटमधील तो एक अनुभवी आणि यशस्वी कॅप्टन आहे. त्याच्या कॅप्टनसीमध्ये मुंबई इंडियन्सनं सर्वात जास्त ५ वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे.

हुशार कॅप्टन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहितची बुधवारच्या मॅचमध्ये झालेली एक चूक माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यानं सांगितली आहे. टीम इंडियानं जयपूरच्या मॅचमध्ये व्यंकेटेश अय्यरला पदार्पणाची संधी दिली. यावर्षीची आयपीएल स्पर्धा (IPL 2021) गाजवणाऱ्या अय्यरकडं हार्दिक पांड्याचा वारसदार म्हणून पाहिलं जात आहे. तो डाव्या हातानं बॅटींगसह मध्यमगती बॉलिंगही करू शकतो.

पण, बुधवारच्या मॅचमध्ये अय्यरला बॉलिंग मिळाली नाही. रोहितनं फक्त ५ बॉलर्सचा वापर केला. आकाश चोप्रानं त्याच्या युट्यूब चॅनलवर या मॅचचं विश्लेषण केलं आहे. यामध्ये त्यानं रोहितच्या चुकीवर बोट ठेवलं आहे. ‘टीम इंडियाला एका फास्ट बॉलिंग ऑल राऊंडरची गरज आहे, असं सांगितलं जातं. त्यामुळेच व्यंकटेश अय्यरची निवड झाली आहे. तरीही त्याला बॉलिंग करण्याची संधी मिळाली नाही. माझ्या मते, ही रोहितच्या मोजक्या चुकांपैकी एक चूक आहे.

सामान्यपणे त्याची कॅप्टनसी परफेक्ट असते, पण ही एक छोटी चूक झाली, असं म्हणता येईल. २ देश, २ अर्धशतकं आणि एकसारखा स्कोअर! न्यूझीलंडच्या खेळाडूचा अनोखा रेकॉर्ड टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग घेतली असेल आणि समोरची टीम चाचपडत खेळत असेल तर त्याला आरामात १-२ ओव्हर्स बॉलिंग देता आली असती. दीपक चहर आणि मोहम्मद सिराजचा दिवसही चांगला नव्हता.’ याकडे आकाशनं यावेळी लक्ष वेधलं.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

आयपीएल फ्रँचायझींनी संघात कायम राखलेल्या खेळाडूंची नावं आली समोर

इंडियन प्रीमिअर लीग २०२२साठी मेगा ऑक्शन होणार आहे आणि त्याआधी ८ फ्रँचायझींना त्यांच्या ४ रिटेन खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सोपवण्याची आज अखेरची तारीख आहे. अहमदाबाद...

” सानिया मिर्झानं पाकिस्तानकडून खेळावं, आम्हाला तिची गरज नाही” नेटकऱ्यांचा संताप

  मुंबई | ऑस्ट्रेलियानं पाच विकेट्स व सहा चेंडू राखून पाकिस्तानवर विजय मिळवताना अंतिम फेरीत प्रवेश केला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदासाठी त्यांच्यासमोर आता न्यूझीलंडचे...

बायकोच्या वाढदिवसानिमित्त सचिन तेंडुलकरने ठाकर भोजनालयात जाऊन घेतला गुजराती थाळीचा आस्वाद !

  मुंबई | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुलाखतींमध्ये आपलं माशांवर अर्थात नॉनव्हेज जेवणावर असलेले प्रेम अनेक माध्यमांवर बोलून दाखवलं आहे. अस्सल नॉन व्हेज खाणारा सचिन...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments