R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या पालकमंत्री सतेज पाटील यांनी विधानपरिषदेच्या जागेसाठी दाखल केला अर्ज

पालकमंत्री सतेज पाटील यांनी विधानपरिषदेच्या जागेसाठी दाखल केला अर्ज

 

कोल्हापूर | पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज महाविकास आघाडीचा प्रतिनिधी म्हणून विधानपरिषदेसाठी आपला अर्ज दाखल केला आहे. यावेळी पत्रकार माध्यमांशी संवाद साधताना पाटील म्हणाले की, येत्या दोन ते तीन दिवसांत हा आकडा आणखी वाढून २७० पर्यंत जाईल असा दावा त्यांनी केला आहे. आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारचा प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केला आहे. जिल्ह्यातील महाविकास आघाडी, इतर घटक पक्ष किंवा अपक्ष असतील या सर्वांचा निश्चितच मला पाठिंबा असणार आहे, त्यामुळे विजय निश्चित आमचाच होणार असल्याचा विश्वास सतेज पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. सतेज पाटील यांना भाजपकडून अमल महाडिक यांचे आव्हान असणार आहे.

दरम्यान, मागीलवेळी झालेल्या निवडणूकीविषयी विचारले असता ते म्हणाले, गेली दोन वर्षे सातत्याने आम्ही सत्ताधारी म्हणून लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. जिल्ह्यातील नगरपालिका किंवा जिल्हा परिषद येथील सदस्यांचा विश्वास आम्ही संपादित केला आहे. आजच्या घडीला महाविकास आघाडीचा आकडा अडीशेच्या खाली नाही. येत्या दोन दिवसात हा आकडा आणखी वाढून २७० पर्यंत जाईल असा मला विश्वास आहे. कागदावर पाहिले तर आम्ही सर्व महाविकास आघाडी एकत्र आहोत त्यामुळे विजय निश्चितपणे आमचाच होईल, असेही ते म्हणाले.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments