R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया "एसटी कामगारांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनवाढ द्यायला तयार आहोत."

“एसटी कामगारांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनवाढ द्यायला तयार आहोत.”

 

मुंबई | एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी मागच्या दोन आठवड्यापासून आंदोलन करत आहे. त्यातच यावर आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी भूमिका मांडलेली आहे. आम्ही एसटी कामगारांना वेतनवाढ द्यायला तयार आहोत. पण केवळ प्रश्न बेसिक वेतनाचा आहे. तो चर्चा करून सोडवला जाईल, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं. तसेच एसटी कामगारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच निर्णय घेतील असंही अनिल परब यांनी सांगितलं.

सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनवाढ द्यायला तयार आहोत. केवळ प्रश्न बेसिक वेतनाचा आहे. तो चर्चा करून सोडवला जाईल. काँग्रेसने आपले मत मांडले. त्याचा विचार समिती करेल. नाना पटोलेंनीही आपले मत समिती समोर मांडावे, असं परब यांनी सांगितलं. तसेच यावेळी त्यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना संरक्षण देण्याच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. गोपीचंद पडळकर आमदार आहेत. त्यांना गरज असेल तर द्यावी लागेल संरक्षण. मुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतील असं सांगतानाच पडळकर नेहमीच सरकारविरोधात बोलतात. ती भाषा संसदीय असेल नसेल. संपात असल्यानं धोका आहे असं वाटत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

रोजंदारी कर्मचाऱ्यांना काल नोटीस दिलीय. आज २४ तासची वेळ संपत आहे. कोण कामावर येत नसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. संपकरी कामावर न आल्यास २०१६-२०१७ आणि २०१९ च्या भरती प्रक्रियेतील वेटिंगवाल्यांचा विचार करावा लागेल, असं त्यांनी सांगितलं. कायदेशीर प्रक्रिया करूनच कारवाई केली जाईल. लोकांची सहानुभूती गेल्यास मग कर्मचारी अडचणीत येतील. सरकार चर्चेसाठी तयार आहेच. सर्व गोष्टींचा अभ्यास करून समिती अहवाल देईल. त्यातून लगेच मार्ग निघणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

लेकाच्या लग्नात गुलाबराव पाटलांचा भन्नाट डान्स होत आहे व्हिडिओ वायरल

  जळगाव | शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा डान्सचा व्हिडीओ समोर आला होता. राऊत यांनी मुलीच्या लग्नातील संगीत कार्यक्रमात...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments