R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या सुभाषचंद्र बोस यांच्या कन्येकडून अभिनेत्री कंगनाच्या वक्तव्याचा समाचार !

सुभाषचंद्र बोस यांच्या कन्येकडून अभिनेत्री कंगनाच्या वक्तव्याचा समाचार !

 

अभिनेत्री कंगना रानौत सतत आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत राहत आहे त्यातच स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर वादग्रस्त विधान करत कंगनाने नवा वाद अंगावर ओढवून घेतला आहे. त्यातच देशाच्या स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर कंगनाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर निशाणा साधला. इंन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत कंगनानं गांधींजींना भुकेले आणि चलाक म्हटलं. एवढंच नव्हे तर भगतसिंगांना फाशी व्हावी, अशी गांधीजींची इच्छा असल्याचंही कंगनानं म्हटलं होतं.

कंगनाच्या या वक्तव्यामुळं तिच्यावर टीकेची झोड उठली होती. अशातच आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कन्या अनिता बोस यांनी कंगनावर पलटवार केला आहे. गांधीजींनी नेताजींसह अनेकांना प्रेरणा मिळाली, असं म्हणत अनिता बोस यांनी कंगनावर निशाणा साधला आहे. मंगळवारी इन्स्टाग्राम स्टोरी टाकत कंगनानं सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंह यांना महात्मा गांधींकडून कोणतंही समर्थन मिळालं नव्हतं, असा दावा केला होता. त्यासोबतच अभिनेत्रीनं गांधीजींच्या अहिंसेच्या मंत्राची खिल्ली उडवत म्हटलं होतं की, कोणासमोर दुसरा गाल पुढं केल्यानं भीक मिळत नाही.

कंगनाच्या या वक्तव्यावर बोलताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कन्या अनिता बोस यांनी भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या की, “नेताजी आणि गांधीजींचं नातं फारच गुंतागुंतीचं होतं. कारण गांधीजींना वाटायचं की, ते नेताजींवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. तर दुसरीकडे माझे वडिल गांधीजींचे मोठे चाहते होते.” पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “नेताजी आणि गांधीजी दोन्ही व्यक्तिमत्त्व महान होती. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. ते एकमेकांना पूरक असून तो एक बंध होता.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी केवळ अहिंसक धोरणच कारणीभूत आहे, असा दावा काँग्रेसच्या काही सदस्यांकडून दीर्घकाळ करण्यात येत होता. पण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, नेताजी आणि इंडियन नॅशनल आर्मी (आयएनए) च्या कारवायांनी देखील भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठं योगदान दिलं होतं.” पुढे बोलताना त्या हेदेखील म्हणाल्या की, “दुसरीकडे असा दावा करणंही चुकीचं ठरेल की, फक्त नेताजी आणि इंडियन नॅशनल आर्मीनं भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. गांधीजींनी नेताजींसह अनेकांना प्रेरणा दिली होती.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments