R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home गैजेट्स खुशखबर| Apple कंपनी लवकरच लॉन्च करणार आतापर्यंतचा सर्वात स्वस्त Iphone

खुशखबर| Apple कंपनी लवकरच लॉन्च करणार आतापर्यंतचा सर्वात स्वस्त Iphone

 

नवी दिल्ली | आयफोन्सचा उच्चतम दर्जा, नावीन्यपूर्ण फीचर्स यांमुळे कोट्यवधी नागरिक याचे चाहते आहेत. अ‍ॅपल कंपनीही प्रत्येक नवा स्मार्टफोन दाखल करताना तो आधीच्या फोनपेक्षा एक पाऊल पुढे असेल, नवीन फीचर्सनी सुसज्ज असेल याची काळजी घेते. त्यामुळे इतर नामांकित ब्रँडच्या तुलनेत आयफोन महाग असूनही नागरिक रांगा लावून त्याची खरेदी करतात.

आपल्या देशातही आयफोनचे कोट्यवधी चाहते असून, आयफोन असणं म्हणजे स्टेटस सिम्बॉल मानलं जातं. सर्वसामान्य वर्गापेक्षा उच्चभ्रू, तसंच तरुण वर्ग याचा मोठा ग्राहक आहे. त्यामुळे भारतही (India) आयफोनसाठी मोठी बाजारपेठ (Market) आहे; मात्र अफाट किमतीमुळे बराच मोठा ग्राहक वर्ग आयफोनपासून दूर राहत असल्यानं अ‍ॅपल कंपनीने आपल्या मुख्य फोनपेक्षा कमी किंमतीतल्या दुसऱ्या मोबाइल फोनची मॉडेल्स दाखल करण्याचं धोरण अवलंबलं आहे.

आयफोन स्वस्त किमतीत दाखल करता यावा यासाठी कंपनी प्रयत्न करत असते, जेणेकरून मोठा ग्राहक वर्ग आयफोनकडे वळवता येईल आणि या बाजारपेठेतला हिस्सा अधिक मजबूत करता येईल. कोरोना साथीच्या संकटातून जग आता सावरत असल्यानं मोबाइल फोनची बाजारपेठही गजबजत आहे. मोबाइल उत्पादक कंपन्या नवनवीन उत्पादनं दाखल करत आहेत. या बाजारपेठेत अ‍ॅपल कंपनीही लवकरच आपली नवीन उत्पादनं दाखल करणार असल्याची चर्चा आहे. ‘झी न्यूज’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

ट्रेंड फोर्स या प्रसिद्ध विश्लेषण संस्थेने नुकत्याच जारी केलेल्या अहवालानुसार, पुढील वर्षी जागतिक फोन बाजारात स्मार्टफोन उत्पादन सुमारे 1.39 अब्ज युनिट्सपर्यंत पोहोचू शकेल. अ‍ॅपल ब्रँडच्या धोरणात्मक योजनेबाबतही या अहवालात माहिती देण्यात आली असून, आगामी नवीन आयफोन उत्पादनं सर्वांचं लक्ष वेधून घेतील असं त्यात नमूद करण्यात आलं आहे.

पुढील वर्षाच्या अखेरीस चार फ्लॅगशिप फोनव्यतिरिक्त, अ‍ॅपल पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या अखेरीस मार्चच्या आसपास स्वस्त मॉडेल्सची नवीन आवृत्ती आयफोन एसई 3 च्या रूपाने (iPhone SE-3) दाखल करेल. आय फोन 13 (iPhone 13) मालिकेतल्या ए -15 (A15) फ्लॅगशिप प्रोसेसरने सुसज्ज आणि 5G नेटवर्कला सपोर्ट करणारा हा फोन अ‍ॅपलचा सर्वांत स्वस्त 5G मोबाइल फोनदेखील ठरेल आणि अनेक बाजारपेठांमध्ये त्याची मागणी वाढेल, असंही या अहवालात म्हटलं आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

Google Account होणार अपडेट, पूर्वीपेक्षा असणार जास्त सुरक्षित

  मुंबई | सध्याच्या डिजिटल युगात, Google आता फक्त एक सर्च इंजिन राहिले नाही तर खऱ्या अर्थाने ते आपल्या जीवनाचा एक आवश्यक भाग बनले आहे....

पुढच्या आठवड्यात फेसबुकचे ‘हे’ फीचर बंद होणार, फेसबुक’ने केली घोषणा

  फेसबुकने नाव बदलल्यानंतर फेसबुकने आपल्या फेसबुक अॅपमध्ये एक मोठा बदल केला आहे. फेसबुकने केलेल्या बदलानुसार, आता यापुढे तुम्ही फोटो अपलोड केल्यावर दुसऱ्याला ऑटो टॅग...

गुगल आणि अँपलकडून ८ लाखांहून अधिक अॅप्सवर बंदी !

  नवी दिल्ली | गुगल आणि अॅपलने त्यांच्या स्टोअरमधून लाखो अॅप्सवर बंदी घातली आहे. Pixalate च्या 'एच १ २०२१ डिलिस्टेड मोबाईल अॅप्स रिपोर्ट'नुसार, २०२१ च्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments