R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति शरद पवारांची भाषा आदिवासी समाजात फूट पाडण्याची; फडवीसांनी लगावला टोला !

शरद पवारांची भाषा आदिवासी समाजात फूट पाडण्याची; फडवीसांनी लगावला टोला !

 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधल्यानंतर आता या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले आहे. शरद पवारांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. ‘दोन दिवसांपूर्वी भोपाळमध्ये आदिवासी संमेलन झाले, तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आदिवासी शब्द न वापरता, वनवासी शब्द वापरला,’ असा आरोप शरद पवारांनी केला होता. त्याला आता देवेंद्र फडणवीसांकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर दोन दिवसांपूर्वी झालेल्या आदिवासी संमेलनाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी संमेलनाला संबोधित करताना दिसत आहेत. आपल्या भाषणात मोदींनी आदिवासी हा शब्द वापरल्याचे दिसत आहे. हा विडिओ शेअर करत फडणीवसांनी पवारांचा आरोप खोदून काढला आहे.

 

हाच व्हिडिओ पोस्ट करत फडणवीसांनी लिहीले की, ‘शरद पवारजी, आपल्यासारख्या मोठ्या नेत्यांनी वस्तुस्थिती जाणून घेत आणि पूर्ण माहिती घेत बोलले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनात जनजाती आणि आदिवासी असे शब्द वापरले आहेत. आपली ही भाषा आदिवासी बांधवांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. ज्यांच्यासोबत आपण सभा घेत आहात, अशांची किमान माहिती घ्यायला हवी की त्यांच्यावर कशाप्रकारचे गुन्हे दाखल आहेत’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

२३ वर्षांत नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की… मालिकांची नारायण राणेंवर घणाघाती टीका

  मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र टीका करण्याचे एकही संधी सोडताना दिसून येत नाहीये....

एनसीबीची मोठी कारवाई; ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

  राज्यात ड्रग्स प्रकरण चांगलेच गाजत असताना एनसीबीची कारवाई सुरूच असलेली दिसून येत आहे त्यातच एनसीबी मुंबईने नांदेडमध्ये कारवाई करत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला...

आघाडीमधील मित्रपक्षांनी काँग्रेसला गृहीत धरू नये, नाना पटोलेंचा इशारा

  कल्याण | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून येणाऱ्या आघवी निवडणुकीला तिन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे बोलले जात होते. मात्र दुसरीकडे येणाऱ्या स्थानिक निवडणुकीत काँग्रेस...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

Recent Comments