R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या माझ्याकडे बंदूक असती तर...' धमकी देत राष्ट्रवादी आमदाराच्या कानशिलात लगावली !

माझ्याकडे बंदूक असती तर…’ धमकी देत राष्ट्रवादी आमदाराच्या कानशिलात लगावली !

 

पाथरी शहरात एक धक्कादायक प्रकरण समोर आलं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार बाबाजानी दुर्राणी यांना एका व्यक्तीनं मारहाण केली आहे. सदर व्यक्ती एवढ्यावरच थांबला नाही तर, त्याने आमदाराला जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता.

याप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली असून सायंकाळी आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी आमदार बाबाजानी दुर्राणी हे शहरातील एका अंत्यविधीच्या कार्यक्रमास गेले होते. येथे शोकाकुल वातावरणात बाकड्यावरून बसून सोबतच्या सहकाऱ्यांशी बोलत होते.

यावेळी पाथरी शहरातील मोहम्मदबीन सईदबीन किलेब हा आमदार दुर्राणी यांच्यासमोर आला. त्यावेळी त्याने अश्लील भाषेत शिवीगाळ करत दुर्राणी यांच्या कानशिलात लगावल्या. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने ‘आता माझ्याकडे बंदूक असती तर तुला गोळ्या घालून ठार केलं असतं’ अशा शब्दांत धमकी दिली आहे.

जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून निघून गेला. ही घटना घडल्यानंतर आमदार दुर्राणी यांनी पोलीस ठाण्यात जात आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सायंकाळी पोलिसांनी संशयित आरोपी मोहम्मदबीन सईदबीन किलेब याला अटक केली आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments