R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या ठाणे -कल्याण मेट्रोचा प्रकल्प कारशेड कशेळीत !

ठाणे -कल्याण मेट्रोचा प्रकल्प कारशेड कशेळीत !

 

ठाणे प्रतिनिधी | ठाणे-भिवंडी-कल्याण दरम्यान उभारण्यात येत असलेल्या मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने करता यावी यासाठी या प्रकल्पाची कारशेड भिवंडी तालुक्यातील कोनगावऐवजी कशेळी येथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रस्तावित जागेतील अतिक्रमणांचा प्रश्न निकाली निघत नसल्याने कारशेडची जागा कशेळी येथे निश्चित करण्यात आली आहे. सुमारे २० हेक्टर दलदलीच्या जागेत ही कारशेड उभारण्यात येणार आहे.

मुंबई-ठाणे मेट्रो प्रकल्पाचा पुढे कल्याणपर्यंत विस्तार करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम ठाणे ते भिवंडी आणि पुढे भिवंडी ते कल्याण अशा दोन टप्प्यांत करण्यात येत आहे. या प्रकल्पात ठाणे ते भिवंडी या पहिल्या टप्प्याची लांबी १२.७ किलोमीटर इतकी असून एकूण सहा मेट्रो स्थानके यामध्ये मोडतात.

मेसर्स अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीमार्फत या प्रकल्पाच्या स्थापत्य कामांना ऑगस्ट २०१९ मध्ये सुरुवात करण्यात आली आहे. या मार्गिकेमध्ये पुनर्वसन तसेच वसाहतींच्या पुनर्बाधणीसारख्या अडचणी नसल्याने पहिल्या टप्प्यातील स्थापत्य कामे ४० टक्क्यांपर्यंत पूर्ण करण्यात आली आहेत, अशी माहिती मुंबई महानगर विकास प्राधिकरणातील वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

या प्रकल्पासाठी कोनगाव भागात कारशेड ठरवण्यात आली होती. मात्र, येथील जागेवर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे झाली असून ती हटवण्यास स्थानिकांचा मोठा विरोध होत आहे. ठाणे-भिवंडीदरम्यान मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा लगतच्या काळात पूर्ण झाल्यास ही मार्गिका कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक कारशेड याच पट्टय़ात असणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन कशेळी भागात २०.६३ हेक्टर इतकी जागा मेट्रो कारडेपोसाठी नक्की करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही जागा दलदलीची असली तरी तिची सुधारणा होऊ शकते,

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments