R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया मी आजही अपक्ष असलो तरी, माझे नेते अजित पवारच....!

मी आजही अपक्ष असलो तरी, माझे नेते अजित पवारच….!

 

मी राज्यातील महाविकास आघाडीला पाठिंबा केवळ विकास कामांच्या मुद्द्यांवर दिला असून मी आजही अपक्ष आमदार आहे, पण माझे नेते हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेच आहेत, अशी सावध भूमिका आमदार संजयमामा शिंदे मांडली. निमगाव येथे आमदार आपल्या दारी उपक्रमाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

करमाळा विधानसभा मतदारसंघात आमदार आपल्या दारी ही योजना मागच्या वर्षभरापासून राबवत असून मध्यंतरी कोरोनामुळे ब्रेक लागला होता. पण आता नव्या जोमाने प्रत्येक मतदारसंघातील जिल्हा परिषद गटात,पंचायत समिती गणात जाऊन सर्वसामान्य माणसांची कामे मार्गी लावण्यात येणार आहे. या उपक्रमाला दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता रावगाव येथून सुरुवात करण्यात येणार आहे.

यावेळी आमदार संजयमामा शिंदे म्हणाले, करमाळा तालुक्यातील कोणत्याही संस्थेचे नुकसान होईल असे काम करणार नसून आर्थिक अडचणीत आलेल्या संस्थाही बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यात कोणत्याही प्रकारचे राजकारण करणार नसल्याचे त्यांनी सांगून बेंद ओढ्याला पाणी सोडण्याबाबत सर्व प्रकारच्या मंजुरी झाल्या असून त्याची कार्यवाही करण्यात येईल.

तसेच सीना माढा उपसा सिंचन योजनेंतर्गत अंबाड,कुर्डू, पिंपळखुटे, शिराळ या गावालाही पाणी मिळेल याबाबत काम सुरू असल्याचे सांगितले. करमाळा तालुक्यात एक सूतगिरणी उभी करणार असल्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून त्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments