R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या .....त्याबद्दल आपल्याला लाज कशी वाटत नाही? विक्रम गोखले संतापले

…..त्याबद्दल आपल्याला लाज कशी वाटत नाही? विक्रम गोखले संतापले

 

मुंबई | भारताला १९४७ मध्ये भीक म्हणून स्वातंत्र्य मिळालं. खरं स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळालं, या अभिनेत्री कंगना राणौतच्या विधानांना पाठिंबा दिल्यानं अभिनेते विक्रम गोखलेंवर जोरदार टीका झाली. त्यानंतर आज गोखलेंनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं. आपण आपल्या मतावर ठाम असल्याचं गोखले म्हणाले. मला माझं मत कोणावरही लादायचं नाही. पण माझं मत बदलणार नाही, असं गोखलेंनी सांगितलं.

माझी कंगनाशी ओळख नसली, तरी माझ्या राजकीय अभ्यासाशी चांगली ओळख आहे. मी जो दुजोरा दिला, त्यामागे माझीही काही कारणं आहेत. ती आता सांगत बसत नाही. १८ मे २०१४ रोजीचा गार्डियनचा अंक वाचा. जे गार्डियनने म्हटलंय, तेच कंगनाने म्हटलंय. त्याची कॉपी माझ्याकडे आहे. त्यामुळे कंगना काहीही चुकीची बोलली नाही असं मी म्हणालो. त्यावरून ताबडतोब बोंबाबोंब सुरू झाली, असं विक्रम गोखले म्हणाले.

२०१४ पासून माझ्यासारख्या सामान्य भारतीयाला खरं स्वातंत्र्य मिळालं हे माझं प्रामाणिक मत आणि ते मी मुळीच बदलणार नाही. मी कोणत्याही स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केलेला नाही. मी त्या मूळ भाषणात असं म्हणालो की, दे दी हमे आझादी बिना ढाल. म्हणजे विना तलवार आणि ढाल आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, मग जे बाकीचे ज्यांनी स्वतःचे प्राण दिले, फाशीवर चढले, ब्रिटिशांना गोळ्या घातल्या, त्यांची अवहेलना झाली याची आपल्याला कोणालाच शरम वाटत नाही? त्यांची दखल घ्यावीशी वाटत नाही? याचा मला राग आला, असं मत गोखलेंनी व्यक्त केलं.

 

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments