R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप थांबत नसल्याने महामंडळाने २३८ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय

एसटी कर्मचाऱ्यांचा संप थांबत नसल्याने महामंडळाने २३८ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय

 

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी मागच्या दोन आठवड्यापासून एसटी कर्मचारी आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे राज्य सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यातच अद्याप एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याचे नाव घेत नसून आज महामंडळाने अखेर २३८ रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तर शुक्रवारी महामंडळाने संपात सहभागी २९७ कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून एकूण निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या २७७६ इतकी झाली आहे.

२७ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून संप मिटण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने महामंडळाने संप मोडायच्या हालचाली चालू केल्या आहेत. एसटी महामंडळाने संपात सहभागी रोजंदारी कामगारांना २४ तासांत कामावर हजर व्हा अन्यथा सेवा समाप्त करण्यात येईल, अशा कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या.

महामंडळाने रोजंदारीवर काम करणाऱ्या २२९६कर्मचाऱ्यांना २४ तासांत कामावर येण्याची नोटीस बजावली होती. त्यापैकी २३८ रोजंदारी कामगारांना आज अखेर त्यांची सेवा समाप्त झाल्याचे सांगण्यात आले आहे. तर आज २९७ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे निलंबित झालेल्या कामगारांची एकूण संख्या आता २७७६ इतकी झाली आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments