R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या ठाणे जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींपैकी ४०४ ग्रामपंचायती कोरोना संसर्ग मुक्त

ठाणे जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींपैकी ४०४ ग्रामपंचायती कोरोना संसर्ग मुक्त

 

ठाणे | मागील दोन वर्षांपासून कोरोना विषाणू ने कहर केला आहे. आता जरी परिस्थिती सुधारली असता त्याच्यात दुर्लक्ष करून चालणार नाही.लसीकरण मोहीम उत्तम प्रकारे चालत आहे. लसीकरण मोहीम पूर्ण झाल्यास कोरोना विषाणूचा धोका अधिका अधिक कमी होईल म्हणनू करोना नियमांचे काटेकोरपणे पालन आणि कोरोनाविषयक जागरूकता यामुळे करोनाच्या दोन्ही लाटेत ठाणे ग्रामीण भागातील सात ग्रामपंचायतीत अद्यापपर्यंत एकही करोना रुग्ण आढळून आलेला नाही.

मुरबाड तालुक्यातील काही गावांचा यामध्ये समावेश आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी दिली. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत शहरी व ग्रामीण भागातही करोना रुग्णांचे प्रमाण अधिक होते. करोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात प्रभावशाली उपाययोजना पहिल्या लाटेपासून राबविल्या जात आहेत. या उपाययोजनेस नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्यामुळे मागील काही दिवसांपासून ठाणे ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याचा दावा जिल्हा परिषदेने केला आहे.

ठाणे जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींपैकी मागील २८ दिवसात ४०४ ग्रामपंचायतीत एकही करोना रुग्ण आढळून आलेला नाही. चाचणी, उपचार, रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध, लसीकरण आणि जनजागृती या पंचसूत्रीवर विशेष भर दिला जात असल्यामुळे सद्यस्थितीला ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे चित्र आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात सर्वत्र थैमान घातलेल्या करोना विषाणूचा शिडकाव ग्रामीण भागात होऊ नये यासाठी ग्रामपंचायत स्तरावर अनेक उपाययोजना आखण्यात आल्या होत्या.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments