R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया मुंबईतून राजहंस सिंह यांना तिकीट, चित्रा वाघ यांना डच्चू !

मुंबईतून राजहंस सिंह यांना तिकीट, चित्रा वाघ यांना डच्चू !

 

मुंबई | स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून जाणाऱया विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपकडून आज उमेदवारी जाहीर करण्यात आली. मुंबईतील जागेसाठी भाजपकडून चित्रा वाघ यांना उमेदवारी दिली जाणार अशी जोरदार चर्चा रंगली होती. मात्र ऐनवेळी चित्रा वाघ यांचा पत्ता कट करीत उत्तर हिंदुस्थानी चेहरा असलेल्या राजहंस सिंह यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी आज दिल्लीतून उमेदवारांची घोषणा केली. मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांना उमेदवारी मिळण्याची आशा होती. मात्र उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली आणि त्यांच्या आशा पुरत्या मावळल्या. उत्तर प्रदेशमधील निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत उत्तर भारतीय उमेदवार देण्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आणि चित्रा वाघ यांचे नाव मागे पडले.

नागपूरमधून भाजपच्या गिरीश व्यास यांच्या जागी विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारलेले माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे कोल्हापुरात काँग्रेसकडून राज्यमंत्री सतेज पाटील यांनी निवडणूक अर्ज दाखल केला. भाजपने त्यांच्याविरोधात अमल महाडिक यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

लेकाच्या लग्नात गुलाबराव पाटलांचा भन्नाट डान्स होत आहे व्हिडिओ वायरल

  जळगाव | शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा डान्सचा व्हिडीओ समोर आला होता. राऊत यांनी मुलीच्या लग्नातील संगीत कार्यक्रमात...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments