R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या इंदिरा गांधींचा उल्लेख करत अभिनेत्री कंगना रानौत म्हणाली की.

इंदिरा गांधींचा उल्लेख करत अभिनेत्री कंगना रानौत म्हणाली की.

 

आपल्या वादग्रस्त विधानाने सातत्याने चर्चेत असलेल्या अभिनेत्री कंगना राणावत हिने आता खलिस्तानवाद्यांवरून नवी पोस्ट शेअर केली आहे. अलीकडेच तिने कृषी कायद्यावरून वादग्रस्त विधान केल्यानंतर आता खलिस्तानवादी दहशतवादाच्या मुद्द्याला हात घालत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या खलिस्तानवादी दहशतवादाविरोधातील भूमिकेचे कौतुक केले आहे.

कंगना रनौतने फेसबुकवर हि पोस्ट शेअर केलेली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, खलिस्तानी दहशतवादी आज आपल्या सरकारचे हात पिरगळण्याचा प्रयत्न करत आहे..पण एका महिलेला विसरू नका. या एकमेव महिला पंतप्रधानांनी त्यांना आपल्या चपलेखाली चिरडलं होते….. त्यांनी (खलिस्तानी) या देशाला कितीही त्रास दिला असला तरी … त्यांनी (माजी पंतप्रधान इंदिरा गांधी) जीवाची बाजी लावून त्यांना डासासारखे चिरडले आहे.. पण देशाचे तुकडे होऊ दिले नाहीत..त्यांच्या मृत्यूनंतरही.. आजही त्यांच्या नावाने हे प्रकरण ओळखले जाते. त्याला एकच गुरू आहे. #repeaalfarmlaws. खलिस्तानी चळवळीच्या उदयाप्रमाणे त्यांची कहाणीदेखील नेहमीपेक्षा अधिक समर्पक झाली आहे…खूप लवकरच तुमच्यासाठी #Emergency आणत आहे.

त्यातच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर केलेला कौतुकाचा वर्षाव शेतकऱ्यांच्या मुद्द्यात काँग्रेसला अप्रत्यक्षपणे भूमिका घ्या असे कंगनाला सांगायचे आहे का काय? असेही वाटत आहे. कारण अलीकडेच कंगनाने तीनही कृषी कायदे मागे घेण्याच्या सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. याबाबत तिने व्यक्त होताना लिहिले होते कि, ‘दुःखद, लज्जास्पद आणि पूर्णपणे चुकीचं आहे. संसदेत बसणाऱ्या सरकारऐवजी आता रस्त्यावर बसलेले लोक कायदे बनवू लागलेत, तर हाही जिहादी देश आहे. अभिनंदन. जे हे सर्व करु इच्छितात.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments