R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया "पागडी रॅकेट'विरुद्ध फौजदारी गुन्हे, ठाणे महापालिकेची तक्रार"

“पागडी रॅकेट’विरुद्ध फौजदारी गुन्हे, ठाणे महापालिकेची तक्रार”

 

ठाणे | ठाणे महापालिकेच्या अखत्यारितील सदनिका लाखोंच्या पागडीवर परस्पर भाड्याने देणाऱ्या रॅकेटविरुद्ध डायघर पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हे दाखल केले. ठाणे महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाचे अधीक्षक तथा उथळसर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी १० जणांविरुद्ध शासनाची फसवणूक, विनापरवानगी घरात घुसणे, कटकारस्थान, मालमत्तेवर बेकायदेशीर ताबा, फसवणूक, छळ आदी नऊ गुन्हे नोंदवले आहेत.

महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थावर मालमत्ता विभागाचे कार्यालयीन अधीक्षक महेश आहेर यांनी या सदनिका सील केल्या आहेत. पालिका कर्मचारी अनिल बागडे लिफ्ट व पाण्याच्या तक्रारींची पाहणी करण्यासाठी गेले असता, तेथे रिक्त असलेल्या महापालिकेच्या ताब्यातील सदनिकांमध्ये अनोळखी संशयास्पद व्यक्ती राहात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हा एकूण १९ सदनिकांमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे भाडेकरार करून अनधिकृत वापर करत असल्याचे आढळले. त्यामुळे तातडीने या १९ सदनिका स्थावर मालमत्ता विभागाच्या पथकाने सील केल्या आहेत.

फसवणूक करणारे दहा आरोपी असून या आरोपींमध्ये विजय रमेश चव्हाण, सुनील हरिप्रसाद रायबोले, खलील शेख, फरहत शेख, विजय हिरालाल जयस्वाल, फैमिना अहमद शेख, एम. एम. अन्सारी, मोहम्मद नादीर शकील अहमद, मुसाफिर हुसेन, शोएब मोहम्मद अन्सारी यांचा समावेश आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

लेकाच्या लग्नात गुलाबराव पाटलांचा भन्नाट डान्स होत आहे व्हिडिओ वायरल

  जळगाव | शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा डान्सचा व्हिडीओ समोर आला होता. राऊत यांनी मुलीच्या लग्नातील संगीत कार्यक्रमात...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

Recent Comments