R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश पुन्हा एकदा स्वच्छ सर्वेक्षणामध्ये ठाणे शहराने राज्यात तिसरा क्रमांक पटकवला

पुन्हा एकदा स्वच्छ सर्वेक्षणामध्ये ठाणे शहराने राज्यात तिसरा क्रमांक पटकवला

ठाणे  | पुन्हा एकदा स्वच्छ सर्वेक्षणामध्ये ठाणे शहराने देशात चौदाव्या क्रमांकवर तर राज्यात तिसरा क्रमांक पटकवला आहे. ठाणे – भारत सरकारच्यावतीने २०२१ मध्ये केलेल्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये ठाणे शहराने देशात चौदाव्या क्रमांकवर तर राज्यात तिसरा क्रमांक पटकवला आहे. विशेष म्हणजे गतवर्षीचा क्र मांक राखण्यात शहराला यश आले आहे. परंतु मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पालिकेला या क्रमांकात जराही सुधारणा करता आलेली नाही. किंवा आपला क्रमांक वाढविण्यात फारसे यश आले नसल्याचेच दिसत आहे.

केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नगर विकास विभागाच्यावतीने दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवण्यात येते. २०२१ रोजी कच:याचे संकलन व त्याची वाहतूक, प्रक्रि या, साफसफाई, जनजागृती, क्षमतावृध्दी आणि निकषांवर स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले होते. ठाणे महापालिका हद्दीत सध्याच्या घडीला १ हजार मेट्रीक टन कचरा तयार होत आहे. त्याची वाहतुक महापालिकेकडून केली जात असली तरी महापालिकेला आजही कच:यावर शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावता आलेली नाही. किंबहुना तसे प्रकल्प देखील पालिकेला यशस्वी करता आलेली नाहीत. त्यातही आजही पालिकेला डम्पींगचा प्रश्न हा योग्य रिताने हाताळता आलेला नाही. आता कुठे दिवा येथील डम्पींग भांडर्ली येथे हालविण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

निवडणुकीच्या तोंडावर या हालचाली झाल्याने त्या बाबत मात्र हा प्रकल्प कितपत यशस्वी होणार या बाबत मात्र साशंकता निर्माण झाली आहे. आज देखील पालिकेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन ओला आणि सुका कचरा वेगवेगळ्या पध्दतीने गोळा करण्यात येत असला तरी एकत्रित करुनच डम्पींगवर टाकला जात आहे. साफसफाईतही पालिकेला म्हणावे तितके यश आलेले नाही. त्यामुळेच मागील वर्षीच्या क्रमांकात कोणत्याही प्रकारे सुधारणा पालिकेला करता आली नसल्याची माहिती पालिका सुत्रंनी दिली.

दरम्यान या सर्वेक्षणामध्ये दोन वर्षापूर्वी क्रमांक हा ५७ वा होता. त्याच्याही आदल्या वर्षी हा क्रमांक ४० वा होता. मागील वर्षी या सुधारणा होऊन हा क्रमांक १४ व्या स्थानावर आल्याने आगाडी घेतल्याचे दिसून आले. तर राज्यात ठाणे शहराने ३ रा क्रमांक पटकवला होता. यंदा देखील त्यात थोडाही बदल झालेला नाही. तरीसुध्दा या यशाबद्दल महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी घनकचरा व्यवस्थापन टीमचे अभिनंदंन केले आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

डोंबिवलीत परदेशातून आलेल्या त्या ६ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

  कल्याण-डोंबिवली | पुन्हा एकदा राज्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.हे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. तसेच लोकांमध्येही भितीचं वातावरण आहे. परदेशातून...

राहुल गांधींवर टीका करणाऱ्या ममता बॅनर्जींना नाना पटोलेंनी दिले सडेतोड प्रतिउत्तर

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर राज्यातील काँग्रेसचे नेते चांगलेच चवताळले आहे. 'वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश...

स्वच्छ सर्वेक्षणात बदलापूर अव्वल, राज्यात दुसरा,देशात १४वा क्रमांक

बदलापूर | स्वच्छ सर्वेक्षणात भरारी घेत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा राज्यातून दुसरा, तर देशातून १४वा क्रमांक पटकावला आहे. तीन वर्षांत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने स्वच्छ...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments