R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी विजय जैस्वाल यांची निवड

व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी विजय जैस्वाल यांची निवड

औरंगाबाद – औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाची सन २०२१-२४ साठी आज सकाळी मॅनोर हॉटेलमध्ये निवडणूक पार पडली. त्यात औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्षपदी विजय जैस्वाल तर महासचिव शिवशंकर स्वामी, कोषाध्यक्ष जयंत देवळानकर यांची निवड करण्यात आली आहे.

७२ विविध संघटनांची शिखर संस्था मानल्या जाणाऱ्या संस्थेसाठी या वर्षी चुरस निर्माण झाली होती. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या महासंघाच्या निवडणुकीचे वारे वाहत होते. शेवटी महासंघाच्या परंपरेप्रमाणे ज्येष्ठ मार्गदर्शक यांच्या मदतीने ही निवडणूक बिनविरोध व एकमताने पार पडली.

यावेळी महासंघाचे अध्यक्ष म्हणून विजय जयस्वाल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर महासचिवपदी शिवशंकर स्वामी, कोषाध्यक्ष म्हणून जयंत देवळाणकर व कार्यकारणी सदस्य यामध्ये उपाध्यक्ष लक्ष्मीनारायण राठी, संजय कांकरिया, अजय मंत्री, खर्डे आप्पा, सहसचिव गुलाम हक्कानी, सुनील अजमेरा, जिल्हा संघटक हरीश पवार, कचरू वेलणकर, मिरज पाटणे यांचा समावेश आहे.

यात ३१ पदासाठी एकूण ३६ कार्यकारणी सदस्यांच्या अर्ज आले होते.‌ त्यातून ३१ कार्यकारणी सदस्य निवडण्यात आले व पदाधिकारी साठी २२ अर्ज आले होते. त्यातून १० उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेऊन ९ पदाधिकारी व ३ जिल्हा संघटक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

या निवडणुकीसाठी ॲड. ज्ञानेश्वर कांबळे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. तर ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून मानसिंग पवार, प्रफुल मालानी, आदेशपालसिंग छाबडा, गोपाल भाई पटेल, व जय शहा यांनी महासंघाच्या कार्यकारिणीची निवड बिनविरोध करण्यासाठी परिश्रम घेतले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

Recent Comments