R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या तीन पक्षांच्या फॉर्म्युल्याला ठाण्यात फाटा मिळण्याची शक्यता आहे.

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या तीन पक्षांच्या फॉर्म्युल्याला ठाण्यात फाटा मिळण्याची शक्यता आहे.

 

ठाणे | आगामी महापालिका निवडणुकीत उल्हासनगरमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसमध्ये आघाडी होण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, राज्यात चालत असलेला या तीन पक्षांच्या फॉर्म्युल्याला ठाण्यात फाटा मिळण्याची शक्यता आहे. सध्या ठाणे महापालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. या सत्तेत कुणाचाही वाटा नको, अशी स्पष्ट भूमिका स्थानिक नेत्यांची आहे. अस्तित्वासाठी झटणाऱ्या काँग्रेसने आधीच एकट्याने निवडणुका लढण्याचे जाहिर केले आहे. दुसरीकडे आघाडीसाठी इच्छुक असलेल्या राष्ट्रवादीनेही आता ‘एकला चलो रे’ ची हाक दिली आहे.

ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ६७, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३४, भाजपचे २४ तर काँग्रेसचे तीन नगरसेवक आहेत. त्रिसदस्य पॅनेलने होणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकीत नगरसेवकांची संख्या १४२ पर्यंत वाढली आहे. यामध्ये स्पष्ट बहुमतासाठी ७२ नगरसेवकांचे बळ आवश्यक आहे. गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ ठाणे महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. भाजपसोबत युती असतानाही शिवसेनेचेच पालिकेवर वर्चस्व होते, तर गेल्या पालिका निवडणुकीत राज्यात मोदी लाट असतानाही भाजपशी फारकत घेऊनही ठाण्यात शिवसेनाच नंबर एकचा पक्ष ठरला होता. दुसरीकडे त्रिसदस्यीय पॅनेल पद्धतही शिवसेनेच्याच पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सत्तेत वाटा देण्यास शिवसेनेनेचे स्थानिक नेतृत्व तयार नसल्याचे समजते.

काँग्रेस आघाडी करण्यास इच्छूक नसेल तर शिवसेना, राष्ट्रवादीची आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. राष्ट्रवादीची ताकद कळवा- मुंब्रापुरती सिमित राहिली आहे. शहरात पक्षाला बळ देण्यासाठी महाआघाडी करण्याची शिफारस करण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी विद्यमान नगरसेवकांच्या जागा कायम ठेवाव्यात आणि उर्वरित जागांचे समान वाटप करावे, असे सूत्र मांडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीतल्या काही नेत्यांकडून केला जात आहे. परंतु, राष्ट्रवादीचा फॉर्म्युला स्वीकारला, तर शिवसेनेच्या वाट्याला ८० ते ८५ जागाच येतील. त्यातून मॅजिक फिगर गाठणे शिवसेनेला अशक्य होणार आहे. याशिवाय राष्ट्रवादी शहरात हातपाय पसरून त्यांना सत्तेतही वाटा द्यावा लागेल, त्यामुळे निदान ठाण्यात तरी महाविकास आघाडी नको, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेच्या सर्वच स्थानिक नेत्यांची आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

महानगरपालिका,नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

  मुंबई |  कोवीड-19 मुळे प्रशासकीय आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या, अशा परिस्थितीत पडताळणी समित्यांकडून केवळ जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्यामुळे उमेदवारांना, राखीव असलेल्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

Recent Comments