R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया कल्याण-डोंबिवली मनपा निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत !

कल्याण-डोंबिवली मनपा निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत !

 

कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना आता राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. मात्र दुसरीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. भाजपचे ५ नगरसेवक लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

निवडणुकीच्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर होणार असून फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. भाजपाचे ५ नगरसेवक सेनेत प्रवेश करणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत भाजपचे हे 5 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील नंदनवन येथे हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.

मुंबईमध्ये १५-२० नगरसेवक सेनेच्या वाटेवर? तर दुसरीकडे मुंबई महापालिकाची निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांनी भाजपचे १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्याच्या आधी सेनेत प्रवेश करतील, असा दावा करून एकच खळबळ उडवून दिला आहे. यशवंत जाधव यांच्या मोठ्या वक्तव्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपुर्वी सत्ताधारी विरूद्ध भाजप असे चित्र पहायला मिळत आहे.

१५ ते २० भाजप नगरसेवक हे डिसेंबर महिन्यापर्यंत निवडणुकीत जाहीर होण्यापूर्वी शिवसेनेत प्रवेश करणार आहे. हे नगरसेवक भाजपच्या नेतृत्त्वाला ते कंटाळून गेले आहे. डिसेंबरमध्ये धमका पहायला मिळेल, असा दावा मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशंवत जाधव यांनी केला आहे. पण भाजपने आमचे कुठलेही नगरसेवक सेनेत प्रवेश करणार नाही, असा दावा केला आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments