R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश पंकजा मुंडे भाजपवर नाराज? या विधानामुळे नव्या चर्चांना उधाण !

पंकजा मुंडे भाजपवर नाराज? या विधानामुळे नव्या चर्चांना उधाण !

 

मुंबई | केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे भाजपा नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याचे बोलले जात होते. तसेच त्यांनी आपली नाराजी उघडउघड बोलून सुद्धा दाखवली होती मात्र दिल्ली दौर्यानंतर त्यांचा सूर बदलला होता. त्यातच पंकजा मुंडे यांची भाजपवरील नाराजी दुर झाली आहे. असं वाटत असताना त्यांच्या मनातील खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे. पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानामुळे त्यांची भाजपवरील नाराजी पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.

पंकजा मुंडे या बुलडाणा जिल्ह्यातील दुसरबीड गावात एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. तर यावेळी बोलताना मी फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेवेन पण पदासाठी कोणापुढे हात पसरणार नाही, असं परखड मत पंकजा मुंडे यांनी मांडलं होत त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. या वक्तव्यामुळे पंकजा मुंडे यांची भाजपवरील नाराजी कायम असल्याचं समोर येत आहे पण पंकजा मुंडेंच्या नाराजीचा फटका भाजपला बसेल का?, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

पंकजा मुंडे यांचं नाव भाजपच्या बड्या नेत्यांच्या यादीत घेतलं जातं. पंकजा मुंडेंचा राज्यातील किमान २५ मतदारसंघात तरी थेट प्रभाव आहे. त्यात पंकजा मुंडे यांना पक्षात न्याय मिळत नाही या कारणामुळे कार्यकर्ते आणि त्यांच्या समर्थकातदेखील नाराजी आहे. पंकजा मुंडे यांनी त्यांच्या वक्तव्यातूनही त्यांची नाराजी दाखवली आहे. त्यामुळे आगामी काळात पंकजा मुंडेंच्या नाराजीचा फटका बसण्याची शक्यता बोलली जात आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

स्वच्छ सर्वेक्षणात बदलापूर अव्वल, राज्यात दुसरा,देशात १४वा क्रमांक

बदलापूर | स्वच्छ सर्वेक्षणात भरारी घेत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा राज्यातून दुसरा, तर देशातून १४वा क्रमांक पटकावला आहे. तीन वर्षांत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने स्वच्छ...

“निवडणुका झाल्या तरी जनतेचा कौल महाविकास आघाडीलाच मिळेल”

  मुंबई |  राज्यात आघाडीचे सरकार कोसळेल अशी भविष्यवाणी सतत विरोधक करताना दिसून येत आहे. त्यातच आता सरकार आज पडणार, उद्या पडणार अशी दिवास्वप्ने वीरोधकांनी...

पाचवी व सहावी रेल्वे मार्गिका लवकरच सेवेत

  डोंबिवली : मुंब्रा-कळवा दरम्यानच्या नव्या पाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पूर्ण झालेल्या कामांची अंतिम चाचपणी सुरू असून हे काम पूर्ण...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

Recent Comments