R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home बॉलिवूड "ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन"

“ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन”

 

मुंबई | चित्रपट आणि नाटकांमध्ये भूमिका साकारणाऱ्या तसेच आपल्या अभिनयच ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे रविवारी दुपारी निधन झाले. सेव्हन हिल रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ५८ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्‍चात पती आणि मुलगी असा परिवार आहे.

माधवी गोगटे यांचा जन्म ७ ऑगस्ट १९६४ रोजी झाला होता. त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली. १९८७ मध्ये ‘सूत्रधार’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर १९९० मध्ये आलेल्या ‘घनचक्कर’ या चित्रपटातील त्यांची भूमिकाही विशेष लोकप्रिय ठरली होती. यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांनी ‘सत्वपरीक्षा’ या मराठी चित्रपटात उत्तम भूमिका साकारली.

माधवी गोगटे यांनी मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये भूमिका केल्या होत्या. त्यांच्या काही भूमिका चांगल्याच गाजल्या. ‘गेला माधव कुणीकडे’, ‘भ्रमाचा भोपळा’ ही त्यांची नाटकं चांगलीच गाजली. ‘मिसेस तेंडुलकर’, ‘कोई अपना सा’, ‘ऐसा कभी सोचा न था’, ‘एक सफर’, ‘बसेरा’, ‘बाबा ऐसो वर ढुंडो’, ‘ढुंड लेंगी मंजिल हमें’, ‘कहीं तो होगा’ या हिंदी मालिकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. सोबतच ‘तुझं माझं जमतंय’ या मराठी मालिकेतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

बिग बॉस ३ मराठी या शोमध्ये येणार “भाईजान”

मुंबई | बिग बॉस मराठीची शान... जेंव्हा मंचावर येणार 'भाईजान'... सदस्य आणि प्रेक्षक ज्या क्षणाची वाट आतुरतेनं बघत होते तो क्षण आता आला आहे....

आमिर खान सोबत लग्नासंबंधीत फातिमा सना शेख चं मोठं वक्तव्य, म्हणाली…

  मुंबई | अभिनेता आमीर खान सध्या लग्नाच्या अफवांमुळे खूप चर्चेत आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, रीना दत्ता आणि किरण राव यांच्यानंतर आमीर खान पुन्हा...

अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच होणार आई? भर कार्यक्रमात केला खुलासा

  मुंबई | अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा हिने उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रियांकाने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. प्रियांकाने प्रसिद्ध अमेरिकन गायक निक जोनाससोबत...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments