R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कर्मचाऱ्यांने पुकारले काम बंद आंदोलन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कर्मचाऱ्यांने पुकारले काम बंद आंदोलन

 

एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारमध्ये महामंडळाचे विलीनीकरण करण्यात यावे यासाठी आंदोलन पुकारलेले असताना आता दुसरीकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. मुंबई विद्यापीठासह राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या स्तरावर प्रलंबित आहेत.

गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा करून देखील सदर प्रश्न सुटत नसल्याने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीनं आज राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक बंद करण्यात येणार आहे. महाविद्यालयाचे कामकाज ठप्प होणार आहे. राज्यातील सर्व महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाची ५८ महिन्याची थकबाकी अदा करावी अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे.

तसेच पाच दिवसाचा आठवडा लागू करावा, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरावीत, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार १०, २० आणि ३० वर्षाच्या सेवेनंतर तीन लाभांची सुधारित योजना लागू करावी. अशा अनेक मागण्या त्यांनी केल्या आहेत. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनीही आज काम बंद आंदोलन केले आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

लेकाच्या लग्नात गुलाबराव पाटलांचा भन्नाट डान्स होत आहे व्हिडिओ वायरल

  जळगाव | शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा डान्सचा व्हिडीओ समोर आला होता. राऊत यांनी मुलीच्या लग्नातील संगीत कार्यक्रमात...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments