R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या अमल महाडिक यांच्या विजयाचा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास...

अमल महाडिक यांच्या विजयाचा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास !

 

कोल्हापूर | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांनी मोठं वक्तव्य केलंय. देशात आगामी काळातही मोदींचीच सत्ता असणार आहे. विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं आणता येतं. ती वेळ काही दिवसांची आहे, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केलाय. इतकंच नाही तर विधान परिषद निवडणुकीत कोल्हापुरातून अमल महाडिक यांचा विजयाचा दावाही पाटील यांनी केलाय.

विधान परिषदेसाठी ६ ठिकाणी १० तारखेला निवडणूक होत आहे. महाडिक यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला जाणार आहे. सहा वर्षांपू्र्वीची आणि आताची परिस्थिती यात फरक आहे. आवडे आणि कोरे मागच्यावेळी आमच्यासोबत नव्हते. आता ते आमच्यासोबत आहेत. या निवडणुकीतच नाही तर जिल्हा परिषद निवडणुकीपासून ते आमच्यासोबत आहेत.

तसेच नवीन तयार झालेल्या नगरपालिकांमध्ये भाजपचं प्राबल्य आहे. १०५ भाजप तर कोरे आणि आवडे यांचे मिळून १६५ सदस्य होतात. बाकीची जुळवाजुळव सोपी आहे. कमी पडणारी ४३ मतं यायला काही अडचण येणार नाही, असंही पाटील म्हणाले. शिरोळच्या येथील यड्रावकर गटानं विधान परिषदेसाठी अखेर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

सतेज पाटील यांच्या सोबत झालेल्या बैठकी नंतर यड्रावकर गटानं निर्णय जाहीर केलाय. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे बंधू आणि जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. यड्रावकर गट महाविकास आघाडीवर नाराज असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. विधान परिषद निवडणुकीतील निर्णयाक मतं यड्रावकर गटाकडं असल्यानं ते कोणाला पाठिंबा देणार याकडे लक्षं लागलं होतं.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments