R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति " महापुरास मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप न केल्याबद्दल राज्य सरकारचे धन्यवाद"

” महापुरास मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप न केल्याबद्दल राज्य सरकारचे धन्यवाद”

 

मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विविध मुद्दयावरून विरोधक महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना दिसून येत आहेत. त्यातच | गेल्या जूलै महिन्यात कोकणातील चिपळूण भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूणमध्ये हाहाकार माजला होता. दरम्यान, या झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांचे कुटूंब उध्वस्त झाले. तर या सर्व घटनेला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

चिपळूण व परिसरात २२ आणि २३ जूलै रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने महापूराची परिस्थिती ओढावली, त्याला केंद्र किंवा राज्य सरकारचं दुर्लक्ष कारणीभूत असल्याचं म्हणणं चुकीचं आहे, असं सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यावर आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला खोचक टोला लगावला आहे.

‘पाऊसच चिपळूणच्या महापूराला जबाबदार असल्याचं सांगत राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात हलगर्जीपणाचे आरोप फेटाळले आहेत. पण चिपळूणच्या महापूरास मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप न केल्याबद्दल राज्य सरकारचे धन्यवाद’, असं म्हणत अतुल भातखळकरांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

 

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

ममता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटू शकणार नाहीत

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात त्या शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे...

२३ वर्षांत नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की… मालिकांची नारायण राणेंवर घणाघाती टीका

  मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र टीका करण्याचे एकही संधी सोडताना दिसून येत नाहीये....

एनसीबीची मोठी कारवाई; ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

  राज्यात ड्रग्स प्रकरण चांगलेच गाजत असताना एनसीबीची कारवाई सुरूच असलेली दिसून येत आहे त्यातच एनसीबी मुंबईने नांदेडमध्ये कारवाई करत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments