R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या डिसले गुरुजी बनले 'डॉक्टर', ग्वाल्हेरच्या आयटीएम विद्यापीठकडून मानद पदवीने सन्मान

डिसले गुरुजी बनले ‘डॉक्टर’, ग्वाल्हेरच्या आयटीएम विद्यापीठकडून मानद पदवीने सन्मान

 

ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसलेगुरुजी यांनी जिल्हा परिषद शाळेच्या गुरुजींनी जागतिक स्तरावरील पुरस्कार मिळवून जगात महाराष्ट्राचं नाव उंच केलं आहे. त्यामुळे, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून शिक्षणक्षेत्रात त्यांचं योगदान घेण्यात येत आहे. तसेच त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कामगिरीमुळे त्यांना मानद पद देत अनेक संस्थांकडून त्यांचा गौरवही होत आहे. आता, डिसले गुरुजींना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे, ते आता शिक्षण क्षेत्रातील डॉक्टर बनले आहेत. डिसले गुरुजींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन फोटो शेअर करत मानद डॉक्टरेट मिळाल्याची माहिती दिली.

शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल ग्वाल्हेरच्या आयटीएम विद्यापीठकडून ही मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे. माझ्यासाठी ही आश्चर्यकारक बाब आहे, या मानद डॉक्टरेट पदवीबद्दल मी आयटीएम विद्यापीठाचे आभार मानतो. तसेच, हा आनंद शब्दात व्यक्त करण्यापलिकडचा आहे, असेही डिसले गुरुजींनी पदवी स्विकारल्यानंतर म्हटले आहे.

ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींची जागतिक बँकेने सल्लागार म्हणून नियुक्ती केली. जून २०२१ ते जून २०२४ या कालावधीकरिता ही नेमणूक करण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या वतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या कामातही झेडपीच्या गुरुजींचं योगदान असणार आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments