R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति मावळ लोकसभेतून पार्थ पवार पुन्हा लढणार, ट्विट करून दिले संकेत !

मावळ लोकसभेतून पार्थ पवार पुन्हा लढणार, ट्विट करून दिले संकेत !

 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री आणि रास्त्रवडीचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे मावळ मतदार संघातून शिवसेना उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात निवडणुकीत उतरले होते. या निवडणुकीत पार्थ पवार यांचा दणाणून पराभव झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा मावळ मतदार संघातून निवडणुकीला उतरणार असल्याचे संकेत खुद्द पार्थ पवार यांनी दिले आहेत. एका ट्वीटमधून त्यांनी स्वतःच तसे संकेत दिलेत.

पार्थ पवारांच्या ट्वीटमधला आशय हा पिंपरी चिंचवडमधील गाववाले आणि बाहेरच्या राजकारणाला अनुषंगाने आहे. हे राजकारण थांबवावं असं पार्थ पवार भाजपला उद्देशून म्हणत असले तरी यातून मावळ लोकसभेत पराभवाला कारणीभूत ठरलेल्या बाहेरच्या उमेदवाराचा मुद्दा देखील ते मांडू पाहतायेत. त्यामुळे हे ट्वीट म्हणजे ‘एक तीर’ दो शिकार’ असाच काहीसा असल्याची चर्चा आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये गाववाले आणि बाहेरचे अशी केवळ चर्चाच रंगत नाहीतर इथलं राजकारण देखील यावरच अवलंबून आहे. हे निवडणुकांच्या निकालावरून याआधी ही अनेकदा अधोरेखित झालंय. पार्थ पवारांना देखील याची अनुभती लोकसभा निवडणुकीत आलीच. मावळ लोकसभेतून शिवसेनेचे स्थानिक उमेदवार श्रीरंग बारणेंच्या पारड्यात मताधिक्य मिळालं, परिणामी बारामतीतून आलेल्या पार्थ पवारांना पराभव चाखावा लागला. कारण बारामतीचे पार्सल परत पाठवा हे निवडणुकीतील प्रचाराचा कळीचा एक मुद्दा होता. स्वतः हा अनुभव घेतलेल्या पार्थ पवारांनी त्याच अनुषंगाने एक ट्विट केलंय.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

२३ वर्षांत नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की… मालिकांची नारायण राणेंवर घणाघाती टीका

  मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र टीका करण्याचे एकही संधी सोडताना दिसून येत नाहीये....

एनसीबीची मोठी कारवाई; ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

  राज्यात ड्रग्स प्रकरण चांगलेच गाजत असताना एनसीबीची कारवाई सुरूच असलेली दिसून येत आहे त्यातच एनसीबी मुंबईने नांदेडमध्ये कारवाई करत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला...

आघाडीमधील मित्रपक्षांनी काँग्रेसला गृहीत धरू नये, नाना पटोलेंचा इशारा

  कल्याण | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून येणाऱ्या आघवी निवडणुकीला तिन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे बोलले जात होते. मात्र दुसरीकडे येणाऱ्या स्थानिक निवडणुकीत काँग्रेस...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

Recent Comments