R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या भारतीय जनता पक्षाकडून 'ऑपरेशन लोटस'ला शिवसेनेचं 'ऑपरेशन धनुष्यबाण'ने उत्तर

भारतीय जनता पक्षाकडून ‘ऑपरेशन लोटस’ला शिवसेनेचं ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ने उत्तर

 

ठाणे | कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. त्यात भाजपचं ‘ऑपरेशन लोटस’ ही संकल्पना सर्वश्रूत असून याच सर्वत्र चर्चा सुद्धा झाली होती. केडीएमसीत भाजपची सत्ता स्थापण करण्यासाठी सर्वोतोपरी तयारी सुरु आहे. पण भाजपला धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे.

भाजपच्या ‘मिशन लोटस’ला आता शिवसेनेकडून ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ने उत्तर देण्यात येतंय. कारण भाजपचे पाच नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आज संध्याकाळी पार पडणार आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेची मुदत संपली आहे. कोरोना संकटामुळे कल्याण डोम्बवली महानगर पालिका निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे शहारत सध्या प्रशासकीय राजवट सुरु आहे. कोरोना रुग्णांची संख्या आता ओसरल्याने महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा कधीही जाहीर होऊ शकते. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत आपली सत्ता स्थापन व्हावी यासाठी भाजपकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहे.

भाजपचे एकीकडे प्रयत्न सुरु असताना शिवसेनेच्या एकनाथ शिंदेकडूनही तोडीस तोड प्रयत्न सुरु असल्याचं दिसत आहे. त्यातूनच भाजपचे पाच नगरसेवक आता शिवसेनेत प्रवेश करत आहेत. विशेष म्हणजे या पाच नगरसेवकांना भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

कल्याण-डोंबिवलीला शिवेसेनेचा बालेकिल्ला म्हटला जातो. कल्याणचे अनेक लोकप्रतिनिधी हे शिवसेनेचेच आहेत. पण गेल्या निवडणुकीत भाजपने मोठी मुसंडी मारली होती. त्यावेळी राज्यात युतीचं सरकार होतं. तरीही शिवसेना आणि भाजप यांनी वेगवेगळी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत शिवसेनेला ५२ जागांवर यश मिळालं होतं. तर भाजपला तब्बल ४२ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर आता आगामी माहापालिकेत नेमकं कोण बाजी मारनर हे पाहावे लागणार आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

Recent Comments