R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या अभिनेत्याच्या पत्नीला मुंबईत अटक, बदनामीच्या भीतीने उकळले कोट्यवधी

अभिनेत्याच्या पत्नीला मुंबईत अटक, बदनामीच्या भीतीने उकळले कोट्यवधी

 

मुंबई | हनी ट्रॅपमध्ये अडकवून मोठमोठे उद्योजक यांच्याकडून लाखोंची खंडणी वसूल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश मुंबई गुन्हे शाखेने केला असून अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक महिला फॅशन डिझायनर आहे. ती नव्वदच्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्याची पत्नी आहे. अभिनेत्याची पत्नी सपना ऊर्फ ​​लुबना वजीरचे तीन साथीदार फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

आरोपी फॅशन डिझायनर लुबना वजीर ऊर्फ ​​सपनाच्या घरी पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात २९ लाखांची रोख रक्कम, 7 मोबाइल, 2 कार आणि आठ लाखांहून अधिक किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या वृत्तामुळे चित्रपट सृष्टीत एकाच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फॅशन डिझायनर लुबना वजीर ही किटी पार्टीजचे आयोजन करते. या कार्यक्रमांतून ती अनेक श्रीमंतांशी मैत्री करते आणि त्यांच्या जवळ येते. यानंतर त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून कोट्यवधींना गंडा घालते. या कामात तिची टोळी तिला मदत करते. या टोळीत काही पुरुष आणि काही महिला मॉडेल्सचा समावेश आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकून फसवणूक झालेल्यांशी आता पोलीस संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments